सायना नेहवालचं फायनलचं स्वप्न भंगलं

www.24taas.com, नवी दिल्ली
भारतीय बॅडमिंटन स्टार सायना नेहवालचं ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशीपची फायनल गाठण्याचं स्वप्न पुन्हा भंगलं. सेकंड सीडेड सायनाला सेमी फायनलमध्ये थायलंडच्या रॅचनोक इन्थनॉनकडून पराभवाचा धक्का सहन करावा लागला.
तब्बल 40 मिनिटे चाललेल्या सेमी-फायनलमध्ये सायना 15-21, 19-21ने पराभूत झाली... रॅचनोकविरूद्ध पहिल्या गेममध्ये सायना पूर्णपणे निष्प्रभ दिसली... मात्र सेकंड गेममध्ये सायनाने रॅचनोकला कडवा प्रतिकार केला.

मात्र सायनाचे प्रयत्न अपुरे पडले.याआधी 2010 साली सायनाने ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशीपची फायनल गाठली होती.

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
saina nehwal, badminton
Home Title: 

सायना नेहवालचं फायनलचं स्वप्न भंगलं

No
158093
No
Authored By: 
Surendra Gangan