आर्चीला पाहण्यासाठी पब्लिकला अक्षरशः याड, एकाला विजेचा शॉक
नागपूर : आर्ची आणि परश्याच्या प्रेमाची सैराट कहाणी आपण सगळ्यांनीच पाहिली आहे. आर्चीचा प्रेमात केवळ परश्याच नाही, तर महाराष्ट्रातली अख्खी तरूणाई बुडाली आहे. पण आर्चीच्या प्रेमात कसा 440 व्होल्टचा झटका बसतो, याचा अनुभव नागपुरातल्या एका तरूणाला आला.
सैराटमुळं रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आलेली आर्ची म्हणजे रिंकू राजगुरू. तिची एक झलक बघण्यासाठी पब्लिकला अक्षरशः याड लागलंय. नागपूरच्या हिल टॉप भागातल्या एकता गणेशोत्सव मंडळाला भेट देण्यासाठी ती आली, तेव्हा तिला पाहण्यासाठी लोक झाडांवर आणि घराच्या छतावर चढले होते. गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आर्ची स्टेजवर आली, तेव्हा तिला पाहण्यासाठी अक्षय वैद्य नावाचा तरूण चक्क तिथल्या ट्रान्सफॉर्मवरवर चढला आणि त्याला विजेचा जबर शॉक बसला. यात त्याचा उजवा हात चांगलाच पोळलाय..पोलीस निरीक्षक राजन माने यांच्या समयसूचकतेमुळे तो थोडक्यात वाचला.
वीजचोरी झाल्याची गंभीर बाब पुढे...
आर्चीच्या प्रेमात बुडालेल्या अक्षयचा जीव जाता जाता वाचला. पण केवळ अक्षयच नव्हे, तर अनेक चाहत्यांचा जीव याठिकाणी आयोजकांनी पणाला लावला होता. आर्चीच्या कार्यक्रमासाठी वीजचोरी झाल्याची गंभीर बाब आता उजेडात आली आहे. मंत्रालय नावानं नटलेला मंडप आणि ज्या स्टेजवर आर्ची चढली, तो स्टेज, या दोन्ही ठिकाणी आकडा टाकून वीजचोरी होत असल्याचं उघड झाले आहे.
आर्चीला पाहण्यासाठी पब्लिकला अक्षरशः याड लागलं, एकाला विजेचा शॉक
