सलमान-आमीरच्या मैत्रीत फूट?

मुंबई: सलमान खान आणि आमीरख खानच्या फॅन्ससाठी एक धक्कादायक बातमी आहे. आमीर-सलमानच्या मैत्रीत फूट पडली की, काय अशा घटना घडल्या आहेत.

in.movie.yahoo.com च्या रिपोर्टनुसार सलमान आणि आमीर सध्या भांडतांना दिसतायेत. आमीर खान सलमानच्या 'बजरंगी भाईजान'च्या यशाच्या पार्टीला हजर होता. सलमाननं घरी ही पार्टी दिली होती. तेव्हा आमीरनं सलमानच्या अभिनयाचं कौतुक करत 'जर असा अभिनय यापूर्वी केला असता तर अधिक चांगल्या चित्रपटांची संधी मिळाली असती', असं म्हटलं.

आणखी वाचा - प्रेम इज बॅक; पाहा, 'प्रेम रतन धन पायो'चा ट्रेलर

सलमानला आमीरचं हे बोलणं लागल्याचं कळतंय. मग तो सलमान आहे बोलण्यात कमी कसा असेल... त्यानंही आमीरला उत्तर दिलं... "मी आपल्या दिग्दर्शकाला क्रेडिट तरी देतो."

सलमानला आमीरचं बोलणं खटकलं, तो म्हणाला मी जरी तुझ्या इतका मेहनती नसलो तरी श्रेय इतरांनाही देतो. 

दरम्यान, याबाबत अजून दोघांकडून अद्याप प्रतिक्रिया आलेली नाही. पण या घटनेनंतरही दोघांची मैत्री शाबूत असावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जातेय. 

आणखी वाचा - सलमान म्हणतो, सोनमपेक्षा ऐश्वर्यासोबत छान दिसत होतो

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

 

 

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
Is Salman Khan - Aamir Khan friendship cracks?
News Source: 
Home Title: 

सलमान-आमीरच्या मैत्रीत फूट?

सलमान-आमीरच्या मैत्रीत फूट?
Yes
No