ऐश्वर्याच्या 'त्या' इंटिमेट सीनवर बोलला अभिषेक बच्चन

मुंबई : ऐ दिल है मुश्किल पाकिस्तानी कलाकारामुळे चांगलाच वादामध्ये सापडला आणि चर्चेत आला. त्यानंतर ऐश्वर्या राय बच्चन आणि रनबीर कपूर यांच्यातील इंटिमेट सीन्समुळे देखील तो चर्चेत आला. बच्चन परिवार यामुळे ऐश्वर्यावर नाराज असल्याचं देखील बोललं जात होतं. आता पत्नी ऐश्वर्याच्या इंटिमेट सीन्सवर विचारल्या गेलेल्या प्रश्नावर अभिषेक बच्चन यांनी मौन सोडलं आहे. अभिषेक बच्चन यांनी पत्नी ऐश्वर्याचा अभिमान असल्याचं म्हटलं आहे.

एका कार्यक्रमादरम्यान अभिषेक बच्चनला या सीनबाबत जेव्हा प्रश्न विचारला गेला तेव्हा त्याने म्हटलं की, 'मी माझ्या फुटबॉल टीमसोबत व्यस्त आहे. म्हणून अजून सिनेमा नाही पाहू शकलो. पण सिनेमातील मी काही सीन्स पाहिले आहेत. जे ऐशने स्वत: मला दाखवले आहेत. मला नाही वाटत की ती खूपच स्टनिंग दिसत आहे. मी लवकरच हा सिनेमा बघेल' असं त्याने म्हटलं आहे.

अभिषेक बच्चनने या सिनेमाचे दिग्दर्शक करन जोहरला धमाकेदार कमाईसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. अभिषेकने म्हटलं की, 'मी करन जोहर आणि त्याच्या संपूर्ण टीमसाठी खूश आहे. मी त्यांना खूप शुभेच्छा देतो.'

या सिनेमात ऐश्वर्या राय, रनबीर कपूर, फवाद खान, अनुष्का शर्मा हे मुख्य भूमिकेत आहेत. बॉक्स ऑफिसवर सिनेमा चांगलाच चालतोय. आतापर्यंत सिनेमाने ९० कोटी कमावले आहेत.

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
Abhishek Bachchan Talk On Aishwarya's intimate scene
News Source: 
Home Title: 

ऐश्वर्याच्या 'त्या' इंटिमेट सीनवर बोलला अभिषेक बच्चन

ऐश्वर्याच्या 'त्या' इंटिमेट सीनवर बोलला अभिषेक बच्चन
Yes
No
Facebook Instant Article: 
Yes