सुनंदा पुष्करांवर कोणी विषप्रयोग केला?

नवी दिल्ली : सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू हा विषबाधेमुळे झाला होता अशी माहिती आज AIIMS च्या डॉक्टरांच्या एका टीमने दिल्ली पोलिसांना दिलेल्या एका वैद्यकीय अहवालात दिली आहे.

माजी केंद्रीय मंत्री शशी थरुर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांचा जानेवारी २०१४ मध्ये गूढरित्या मृत्यू झाला होता. त्यावर अनेक तर्क लढवले जात होते. 



यावर दिल्ली पोलिसांनी एका तपासगटाची स्थापना केली होती. अमेरिकेच्या 'एफबीआय' या शोधसंस्थेने तपास करुन यात रेडीओअॅक्टीव्ह पदार्थामुळे हा मृत्यू झाल्याची शक्यता फेटाळून लावली आहे. 

याच धर्तीवर AIIMS च्या डॉक्टरांच्या एका टीमने अहवाल तयार करून दिल्ली पोलिसांना एक अहवाल आज दिला आहे. आता यात कोणते विष वापरले गेले याचा शोध घेणे आवश्यक ठरणार आहे. 

याप्रकरणी आता शशी थरूर यांची चौकशी होण्याचीही शक्यता आहे. 

दरम्यान सुब्रमण्यम स्वामी यांनी आता याविषयी न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याचे म्हटले आहे. 

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
Who Killed Sunanda Pushkar
News Source: 
Home Title: 

सुनंदा पुष्करांवर कोणी विषप्रयोग केला?

सुनंदा पुष्करांवर कोणी विषप्रयोग केला?
Yes
No
Section: