सुनंदा पुष्कर मृत्यूप्रकरण : एफबीआयचा फॉरेन्सिक अहवाल समोर

नवी दिल्ली : सुनंदा पुष्कर गूढ मृत्यूप्रकरणी एफबीआयचा फॉरेन्सिक अहवाल समोर आला आहे. सुनंदा यांच्या शरीरात पोलोनियम या विषाचा समावेश नसल्याचं या रिपोर्टमधून समोर येत आहे. एफबीआयनं हा रिपोर्ट दिल्ली पोलिसांकडे पाठवलाय.

दिल्ली पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत. दिल्ली पोलिसांनी फेब्रुवारी महिन्यात सुनंदा यांचा व्हिसेरा रिपोर्ट अमेरिकेची तपासयंत्रणा एफबीआयकडे पाठवला होता. ज्या विषामुळं सुनंदा यांचा मृत्यू झालाय त्याचा खुलासा भारतीय प्रयोगशाळेत होऊ शकत नाही असा सल्ला एम्सच्या डॉक्टरांनी दिला होता.

सुनंदा पुष्कर यांची हत्या झाल्याच्या मानत दिल्ली पोलीस तपास करत आहेत.  जानेवारी २०११मध्ये सुनंदा यांचा मृतदेह हॉटेल लीलामध्ये संशयास्पद अवस्थेत आढळला होता. त्यांच्या मृत्यूबाबत घातपात असल्याचा संशय व्यक्त होत होता.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
Sunanda Pushkar case: FBI rules out radioactive poisoning
News Source: 
Home Title: 

सुनंदा पुष्कर मृत्यूप्रकरण : एफबीआयचा फॉरेन्सिक अहवाल समोर

सुनंदा पुष्कर मृत्यूप्रकरण : एफबीआयचा फॉरेन्सिक अहवाल समोर
Yes
No
Section: