शाळांमध्ये 'सेक्स एज्युकेशन'वर बंदी हवी - आरोग्यमंत्री
नवी दिल्ली : शाळेत दिल्या जाणाऱ्या सेक्स एज्युकेशन म्हणजेच लैंगिक अभ्यासावर बंदी आणायला हवी, असं केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी म्हटलंय.
आपल्या नावाच्या एका वेबसाईटवर drharshvardhan.com वर आरोग्यमंत्र्यांनी हे वादग्रस्त म्हणणं मांडलंय. महत्त्वाचं म्हणजे, आरोग्यमंत्री हर्षवर्धन हे स्वत: व्यावसायानं एक डॉक्टर आहेत. ते ईएनटी (कान-नाक-घसा) तज्ज्ञ आहेत आणि दिल्लीत ते खाजगी प्रॅक्टीस करतात.
तथाकथित, शाळेत विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या सेक्स एज्युकेशनवर बंदी आणायला हवी. कोर्समधील अभ्यासाला व्हॅल्यू एज्युकेशनसोबत विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवण्याची गरज आहे. तसंच विद्यार्थ्यांना भारताच्या संस्कृतीसंबंधी जास्तीत जास्त माहिती देणं आवश्यक आहे, असं हर्षवर्धन यांनी आपल्या वेबसाईटवर म्हटलंय.
डॉ. हर्षवर्धन सध्या अमेरिकेत आहेत. त्यामुळे, याबद्दल त्यांची प्रतिक्रिया मिळालेली नाही. यासंबंधी आरोग्य मंत्रालयात विचारणा केली असता हे डॉ. हर्षवर्धन यांचे वैयक्तिक विचार आहेत, असं सांगण्यात येतंय. तर दिल्लीचे भाजपचे प्रवक्ते संचय कौल यांच्या म्हणण्यानुसार, शाळांमध्ये सेक्स एज्युकेशन दिलं जावं किंवा नाही यासंबंधी पक्षात कोणतीही चर्चा झालेली नाही. त्यामुळे, आत्ताच आपण काहीही प्रतिक्रिया देऊ शकत नाही, असं त्यांनी म्हटलंय.
यापूर्वी, सरकारनं कंडोमच्या वापराला प्रोत्साहन देण्याऐवजी भारतीय संस्कृतीच्या आणि पती-पत्नींमध्ये प्रामाणिक शारीरिक संबंधांना प्रोत्साहन देण्यास हवं, या डॉ. हर्षवर्धन यांच्या वक्तव्यावरही बराच वाद झाला होता.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
शाळांमध्ये 'सेक्स एज्युकेशन'वर बंदी हवी - आरोग्यमंत्री
