बायकोला काढली फेसबूकवर विकायला
इंदूर: कर्जाचा बोजा वाढल्यामुळे इंदूरमध्ये एका नवऱ्यानं आपल्या बायकोला विकायला काढलं आहे. एवढच नाही तर त्यानं फेसबूकवरही 1 लाख रुपयात बायको विकणे आहे, अशी पोस्ट टाकली आहे.
हा सगळा प्रकार लक्षात आल्यानंतर बायकोनं पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आणि नवरा दिलीप माळी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या नवऱ्याचा शोध आता पोलीस घेत आहेत.
दिलीप माळीनं आपली बायको आणि अडिच वर्षांच्या मुलीचा फोटो फेसबूकवर अपलोड केला, आणि बायको विकण्याचा मेसेज लिहीला, इतकच नाही तर ज्यांना विकत घ्यायची आहे त्यांच्यासाठी दिलीपनं आपला मोबाईल नंबरही फेसबूकवर दिला.
मी वेगवेगळ्या लोकांकडून कर्ज घेतलं आहे, आणि त्याची परतफेढ करण्यासाठी मी बायकोला विकायचं ठरवलं आहे, असं त्यानं या पोस्टमध्ये म्हंटलं आहे.
कर्जाचे पैसे मागण्यासाठी लोकांच्या रांगा लागायच्या, त्यामुळे दिलीप इंदूरवरून गावाला निघून गेला. त्यानंतर मी मुलीबरोबर माझ्या आई-वडिलांबरोबर राहत आहे, अशी प्रतिक्रिया दिलीपच्या बायकोनं दिली आहे.
बायकोला काढली फेसबूकवर विकायला
