'पद्म पुरस्कारावर लाथच मारायला हवी'

मुंबई : "पद्म पुरस्कारावर लाथच मारायला हवी"  असं आक्रमक वक्तव्य संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष शरद यादव यांनी केले आहे. 'पद्म पुरस्कार केवळ अप्रामाणिक आणि समाजातील उच्च वर्गातील लोकांनाच दिले जातात. अशा पुरस्कारांवर समाजवादी विचारसरणीच्या लोकांनी लाथच मारली पाहिजे', असं यादव यांनी म्हटलंय, यामुळे आणखी एक नवा वाद निर्माण केला. 

यंदाच्या पद्म पुरस्काराने गौरविलेल्यांच्या यादीत एकही दलित, आदिवासी किंवा शेतकरी नाही, अशी टीका शरद यादव यांनी केली. या विधानांमुळे वाद निर्माण झाल्यानंतरही यादव आपल्या वक्तव्यावर ठाम राहिले.

यावर पुढे बोलतांना शरद यादव म्हणाले, गेली ६८ वर्षे हेच सुरू आहे,  "मी जे काही म्हणालो, ते खरेच आहे. यंदा एकाही दलिताला किंवा आदिवासीला किंवा शेतकऱ्याला पद्म पुरस्कार मिळालेला नाही, असं यादव यांनी ठणकावून सांगितलं आहे. काही दिवसांपूर्वी यादव यांनी लोकसभेमध्ये दाक्षिणात्य महिलांच्या रंग आणि सौंदर्याविषयी वादग्रस्त विधान केल्यानंतर ते वादात आले होते.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

 

 

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
Padma Awards Given Only to 'Dishonest' People, Says Sharad Yadav
News Source: 
Home Title: 

'पद्म पुरस्कारावर लाथच मारायला हवी'

'पद्म पुरस्कारावर लाथच मारायला हवी'
Yes
No
Section: