मोबाईलमध्ये सेल्फी घेता घेताच ती ट्रेनमधून खाली कोसळली!

अलाहाबाद : सेल्फी बळीच्या अनेक घटना आपण एव्हाना ऐकल्या असतील... तरीही लोक काही सुधारण्याचं नाव घेत नाहीत. नुकतच, सेल्फी काढताना एका मुलीला अपघाताला सामोरं जावं लागल्याची घटना घडलीय. 

उत्तरप्रदेशातील अलाहाबादमध्ये ब्रह्मपुत्रा एक्सप्रेसच्या एसी कोचमधू बबित सोरया ही १७ वर्षांची मुलगी प्रवास करत होती. युमना ब्रिज पार केल्यानंतर तिनं आपला फोन बाहेर काढला आणि सेल्फी घेण्याचा प्रयत्न करू लागली.   

याच दरम्यान तिचं तोल गेला आणि चालत्या ट्रेनमधून ती खाली कोसळली. यानंतर तातडीनं लोकांनी ट्रेनची चेन खेचून ट्रेन रोखली... आणि तिला वाचवण्यासाठी ट्रेनमधून खाली धाव घेतली. 

जखमी अवस्थेत बबित हिला हॉस्पीटलमध्ये भर्ती करण्यात आलं.... तिची प्रकृती गंभीर परंतु स्थिर असल्याची माहिती मिळतेय. 

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
girl fallen from train while trying to take selfie from her phone
News Source: 
Home Title: 

मोबाईलमध्ये सेल्फी घेता घेताच ती ट्रेनमधून खाली कोसळली!

मोबाईलमध्ये सेल्फी घेता घेताच ती ट्रेनमधून खाली कोसळली!
Yes
No
Section: