मुलायमना झटका, सायकल अखिलेशचीच!

लखनऊ : समाजवादी पार्टीमध्ये सुरु असलेल्या वादामधला सगळ्यात मोठा झटका मुलायमसिंग यादव यांना बसला आहे. समाजवादी पार्टीचं निवडणूक चिन्ह असलेली सायकल ही अखिलेश यादव यांची असल्याचं निवडणूक आयोगानं जाहीर केलं आहे.

दरम्यान मुलायम सिंग आणि अखिलेश यांच्यामधले संबंध आणखी ताणले गेले आहेत. मी ३ वेळा अखिलेशला बोलावलं पण तो एक मिनिटासाठी आला आणि माझं न ऐकताच निघून गेला. माझा मुलगा दुसऱ्याच्या हातामध्ये खेळला जात आहे. रामगोपालच्या इशाऱ्यावर काम करतो आहे, असं मुलायम सिंग म्हणाले आहेत.

मी पक्ष आणि सायकल दोघांना वाचवण्याचा प्रयत्न केला पण अखिलेशने माझं ऐकलं नाही त्यामुळे आता मी त्याच्या विरोधात लढण्याचा निर्णय घेतला आहे, अशी प्रतिक्रियाही मुलायम यांनी दिली आहे. 

 

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
Cycle belongs to Akhilesh big blow to mulyam singh from election commission
News Source: 
Home Title: 

मुलायमना झटका, सायकल अखिलेशचीच!

मुलायमना झटका, सायकल अखिलेशचीच!
Yes
No
Section: 
Facebook Instant Article: 
Yes