भाजप आमदाराची टोल कर्मचाऱ्याला मारहाण

बरेली : उत्तर प्रदेशमधले भाजप आमदार महेंद्र यादव यांनी टोल कर्मचाऱ्याला मारहाण केली आहे. मारहाणीचा हा व्हिडिओ कॅमेरामध्ये कैद झाला आहे. मारहाणीची ही घटना १७ एप्रिलला फतेहगंजमध्ये झाली होती.

आमदार महेंद्र यादव यांच्या गाडीला टोलमधून सूट देण्यात आली पण यादव यांच्या ताफ्यातील गाड्यांची टोल कर्मचाऱ्यांनी अडवणूक केली यामुळे भडकलेल्या यादव यांनी ही मारहाण केल्याची माहिती आहे.

दरम्यान मी टोल कर्मचाऱ्याला मारहाण केली नाही तर धक्का दिला. टोल कर्मचाऱ्यांनी अपमानास्पद वागणूक दिली, असं वक्तव्य यादव यांनी केलं आहे. एकीकडे केंद्रातल्या मोदी सरकारनं व्हीआयपी कल्चर संपवण्यासाठी मंत्र्यांच्या गाडीवरून लाल दिवा काढण्याचा निर्णय घेतला आहे पण मोदींच्याच पक्षाचा आमदार अशाप्रकारे टोलनाक्यांवर हाणामारी करत आहे.

पाहा महेंद्र यादव यांची मारहाण 

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
BJP MLA assaults toll plaza employee
News Source: 
Home Title: 

भाजप आमदाराची टोल कर्मचाऱ्याला मारहाण 

भाजप आमदाराची टोल कर्मचाऱ्याला मारहाण
Yes
No
Section: 
Facebook Instant Article: 
Yes