नोटाबंदीनंतर 48 तासांत विकले गेले 4 टन सोने

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी गेल्या वर्षी 8 नोव्हेंबरला नोटाबंदीची घोषणा केली होती. या घोषणेनंतर सोन्याची रेकॉर्ड तोड विक्री झालीये. नोटाबंदीनंतर 48 तासांत तब्बल 4 टन सोने विकले गेले ज्याची किंमत तब्बल 1,250 कोटी रुपयांपेक्षाही अधिक आहे.

डायरेक्टरेट ऑफ सेंट्रल एक्साइज इंटेलिजंसने केलेल्या सर्वेतून ही माहिती समोर आलीये. अधिकाऱ्यांचा दावा आहे की, 8 नोव्हेंबरच्याच रात्रीच तब्बल 2 टन सोन्याची विक्री झाली. यात मोठ्या प्रमाणात काळा पैसा पांढरा करण्याचे काम झाले. दिल्लीतील एका मोठ्या सराफा व्यापाराने 700 लोकांना तब्बल 45 किलो सोने विकले. 

चेन्नईच्या ललिता ज्वेलर्सने 8 नोव्हेंबरच्या दिवशी एकाच दिवसात 200 किलो सोने विकले. याआधी आदल्या दिवशी केवळ 40 ग्रॅम सोने विकले गेले होते. एक्साईज अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार जयपूरच्या लावत ज्वेलर्सकडे 7 नोव्हेंबरला सोन्याचा स्टॉक केवळ 100 ग्रॅम होते मात्र 8 तारखेला हे प्रमाण 30 किलोंवर पोहोचले. 

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
4 ton gold sold in 48 hours
News Source: 
Home Title: 

नोटाबंदीनंतर 48 तासांत विकले गेले 4 टन सोने

नोटाबंदीनंतर 48 तासांत विकले गेले 4 टन सोने
Yes
No
Section: 
Facebook Instant Article: 
Yes