राष्ट्रपतींना भेटून मोदी करणार सत्ता स्थापनेचा दावा

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
केंद्रात लवकरच मोदी सरकारची स्थापना होणार आहे. भावी पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी दुपारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेणार आहेत. यावेळी ते सत्तास्थापनेचा दावा करणार आहेत.
नरेंद्र मोदी 25 मे रोजी सायंकाळी सहा वाजल्याच्या दरम्यान पंतप्रधानपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. भाजपाकडून राष्ट्रपतींकडे 25 मेची शिफारस करण्यात येणार आहे. हे शक्य झालं नाही तर नरेंद्र मोदी 28 मे रोजी शपथ घेतील. राजनाथ सिंह यांनी दिलेल्य माहितीनुसार, भाजपच्या संसदीय दलाच्या बेठकीत नरेंद्र मोदी यांनाच आपलं नेता म्हणून निवडण्यात येणार आहे. संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये आज एनडीएची बैठक आयोजित करण्यात आलीय.
सध्या, मोदी सरकारमध्ये कुणाला कोणता विभाग देण्यात येईल यावर चर्चा झडत आहेत. अनेक मुद्द्यांवर वेगवेगळ्या बाजुंनी विचार सुरू आहे. पूर्ण बहुमतानं निवडून आलेल्या मोदींना इतरांना संतुष्ट करण्याचं शिवधनुष्य पेलण्याची गरजच पडणार नाही. त्यामुळेच ते आपलं मंत्रिमंडळ अगदी छोटंही ठेऊ शकतील.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
narendra modi to meet president on tuesday know about new govt cabinet
Home Title: 

राष्ट्रपतींना भेटून मोदी करणार सत्ता स्थापनेचा दावा

No
170165
No
Authored By: 
Shubhangi Palve