आबा पाटीलांचे मानसिक संतुलन बिघडलयं- मनसे आमदार
www.24taas.com, औरंगाबाद
गृहमंत्री आर.आर. पाटील यांचे मानसिक संतुलन बिघडलं आहे, अशा शब्दांत मनसे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आबांवर तोफ डागली आहे.
‘झी 24 तास’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत औरंगाबादमध्ये जाधव यांनीच पोलिसांना रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण केल्याचा आरोप केला होता. हे प्रकरण कोर्टात असल्यानं त्यावर भाष्य करणं हा न्यायालयाचा अवमान असल्याचा आरोप जाधव यांनी केला आहे.
तसंच आबांविरुद्ध कोर्टाचा अवमान केल्याबाबत याचिका दाखल करणार असल्याचं त्यांनी म्हंटलं आहे. आधीच मुंबई हिंसाचाराच्या निमित्ताने मनसे आबांचा राजीनामा मागत आहे. आणि आता त्यात या प्रकरणाने त्यांच्या चिंतेत आणखी भर पडण्याची शक्यता आहे.
English Title (For URL purpose only - Max 200 characters):
Mns on r.r.patil
Home Title:
आबा पाटीलांचे मानसिक संतुलन बिघडलयं- मनसे आमदार

No
153649
No
Section: