वांद्र्यात दुमजली इमारत कोसळून एकाचा मृत्यू, 22 जणं जखमी

मुंबई : मुंबईतील वांद्रे परिसरात वेस्टर्न एक्सप्रेस हायवेजवळ इमारत कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे आणि 22 जणं जखमी असल्याची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान बुधवारी रात्री ही घटना घडल्याने एकच खळबळ माजली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, इमारत कोसळल्याच्या ढिगाऱ्याखाली काही जणं अडकून पडले असल्याची शक्यता आहे. ही दुर्घटना झाल्याचं कळताच स्थानिकांनी अग्निशमन दलाचे अधिकारी येण्यापूर्वीच काही जणांची मदत केली. 

सद्यस्थितीला अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी आहेत. अधिकाऱ्यांकडून लोकांना वाचवण्याचं काम केलं जातंय. या दुर्घटनेत जखमी झालेल्यांना जवळच्या भाभा रूग्णालयात दाखल करण्यात आलंय. 

मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, वांद्रेच्या शास्त्री नगरमध्ये जी+2 इमारत कोसळून एकाचा मृत्यू झाला. यामध्ये बचावकार्य सुरू आहे. तीन ते चार लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जातेय.

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
Mumbai bandra Building Collapse one people death
News Source: 
Home Title: 

वांद्र्यात दुमजली इमारत कोसळून एकाचा मृत्यू, 22 जणं जखमी

वांद्र्यात दुमजली इमारत कोसळून एकाचा मृत्यू, 22 जणं जखमी
Yes
No
Facebook Instant Article: 
Yes
Mobile Title: 
वांद्र्यात दुमजली इमारत कोसळून एकाचा मृत्यू, 22 जणं जखमी
Publish Later: 
No
Publish At: 
Thursday, June 9, 2022 - 06:56
Request Count: 
1
Is Breaking News: 
No