आतापर्यंतच्या महत्त्वाच्या बातम्या | 16-12-2021

मुंबई : आतापर्यंतच्या ताज्या घडामोडी... वर्ष संपत असताना  थर्टी फर्स्टसाठी नव्या निर्बंधांसाठी मोठा निर्णय... ओमायक्रॉनच्या रूग्ण संख्येत वाढ... नागपूर आणि पुणे, पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रात आजपासून शाळा सुरू होता आहेत... आणखी काही महत्त्वाच्या बातम्या खालील प्रमाणे...

1. म्हाडा पेपरफुटीचा सूत्रधार प्रीतिश देशमुखकडे TETची ओळखपत्रं सापडली आहेत. घर, लॉकर झडतीत 50 ओळखपत्रं सापडली आहेत.  21 नोव्हेंबरला झाली होती टीईटीची परीक्षा...

2. पुणे सायबर पोलिसांना आता टीईटी परीक्षा बाबत मोठे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे. म्हाडा पेपरफुटीचा सूत्रधार प्रितिश देशमुखच्या घराची झडती घेतली तेव्हा धक्कादायक साहित्य सापडलं. त्यामुळे आरोग्यविभाग, पोलीस भरतीनंतर आता शिक्षक पात्रता परीक्षाही संशयाच्या भोव-यात आहे. कारण प्रितिश देशमुखच्या घराच्या झडतीत TET परीक्षेची 50आयकार्ड्स सापडलीयत. त्याच्या लॉकरचीही झडती घेतली. त्यातही अपात्र विद्यार्थ्यांची आयकार्ड्स सापडलीयत. विद्यार्थ्यांच्या आक्षेपानंतर TETची उत्तरसुची जाहीर नाही

3. नागपूर आणि पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी. नागपूर आणि पुणे, पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रात आजपासून शाळा सुरू होता आहेत... नागपुरात इयत्ता पहिली ते सातवीचे वर्ग सुरू करण्याचे आदेश नागपूर महापालिकेचे आयुक्त राधाकृष्णन. बी यांनी जारी केलेत.. तर दुसरीकडे पिंपरी चिंचवडमधल्याही पहिली ते सातवीच्या शाळा आजपासून सुरु करण्याचे आदेश आयुक्त राजेश पाटील यांनी काढलेत. कोरोना नियमांचं पालन करुन आणि पालकांच्या समंतीपत्रानंतर या शाळा भरणार आहेत.

4. कोल्हापूर शहरात आणखी दोन गवे शिरले आहेत. जयंती नाला, कदमवाडी भागात गव्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. वनविभाग आणि आपत्ती व्यवस्थापन गव्यांच्या मागावर आहेत. त्यामुळे नागरिकांना सावध राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

5. दोन लस मात्रा ही लोकल प्रवासासाठी महत्त्वाची अट ठेवण्यात आलीय. मात्र ही अट कशाच्या आधारे ठेवलीय अशी विचारणा हायकोर्टाने राज्य सरकारकडे केली. राज्याच्या मुख्य सचिवांना बुधवारपर्यंत प्रतिज्ञापत्राद्वारे स्पष्टीकरण देण्यास न्यायालयाने सांगितलंय. तसंच दोन लस न घेतलेल्यांना लोकलप्रवास करू देण्यास परवानगी देणार कीनाही याबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश कोर्टाने दिलेत. 

6. ओमायक्रॉन रूग्णांची संख्या वाढत असली तरी थर्टी फर्स्टसाठी नवे निर्बंध असणार नाहीत अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीय. कोरोनाचे नियम पाळण्याचं आवाहन त्यांनी केलंय. अर्थात हा दिलासा राज्याकरता असेल. मुंबई महापालिकेनं मात्र ओमायक्रॉनचा धोका लक्षात घेऊन काही निर्बंध कडक केले आहेत. 

7. तरुणींच्या लग्नाचं किमान वय आता 21 होण्याची शक्यताय. तरुणींच्या लग्नाचं वय सद्यस्थितीत 18 आहे. मात्र ते बदलून 21 करण्याचा सरकारचा विचार आहे. तरुण आणि तरुणींसाठी लग्नाचं किमान वय एकसमान म्हणजेच 21 वर्षे असावं असा विचार आहे. त्यासाठी याबाबत सुधारणांचं विधेयक कॅबिनेट बैठकीत मंजूर करण्यात येण्याची शक्यताय. हिवाळी अधिवेशनात हे विधेयक सादर होण्याची शक्यता आहे. 

8. लिव्ह इन रिलेशनशिपसाठी मुलीचं वय कमीत कमी वय 21 वर्ष असावं याबाबत पंजाब-हरियाणा हायकोर्टानं केंद्र सरकारला जबाब दाखल करण्यास सांगीतलंय.. या प्रकरणी तीन मंत्रालय काम करत असून त्यासाठी मुदतवाढ द्यावी अशी मागणी केंद्र सरकारनं केलीये.. हायकोर्टानं केंद्राची विनंती मान्य करुन सरकारला जबाब दाखल करण्यासाठी जानेवारीच्या अखेरच्या आठवड्यापर्यंत मुदत दिलीये. 

9. ओबीसी आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय हा अतिशय दुर्दैवी आणि इतर मागासवर्गीय समुदायावर अन्याय करणारा असल्याचं भाष्य एकनाथ खडसेंनी केलंय...केंद्र सरकारने इंपेरिकल डेटा न दिल्यामुळे ही स्थिती उद्भवली असून आता काहीही करा, पण आरक्षण मिळाल्याशिवाय निवडणुका घेऊ नका अशी आपली भूमिका असल्याचे प्रतिक्रिया माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी दिलीय... 

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
Most Imp News of today up till now
News Source: 
Home Title: 

आतापर्यंतच्या महत्त्वाच्या बातम्या | 16-12-2021
 

आतापर्यंतच्या महत्त्वाच्या बातम्या | 16-12-2021
Yes
No
Facebook Instant Article: 
Yes
Mobile Title: 
आतापर्यंतच्या महत्त्वाच्या बातम्या | 16-12-2021
Publish Later: 
No
Publish At: 
Thursday, December 16, 2021 - 08:48
Request Count: 
1
Is Breaking News: 
No