'राजकारणासाठी भाजपने राज ठाकरे यांचा बळी दिला'

मुंबई : मनसेच्या (MNS) खांद्यावर बंदूक ठेवून भाजपने (BJP) महाराष्ट्रात हिंदुत्वाचा गळा घोटला, असा आरोप शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. भाजपने मनसेला पुढे करुन हा विषय चर्चेत आणला, गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील आणि जिल्ह्यातील प्रमुख तिर्थस्थान असतील म्हणजे शिर्डी, त्र्यंबकेश्वर यासह अनेक मोठ्या मंदिरांमध्ये सकाळच्या काकड आरत्या होतात. काकड आरतीला मंदिरात खूप कमी लोकांना प्रवेश असतो, पण त्याचा आनंद घेण्यासाठी मंदिराच्या आसपास हजारो लोक उभे असतात. 

आज भोंग्याचा विषय निर्माण झाल्यामुळे या देवस्थानावर लाऊडस्पीकर लागले नाहीत आणि हिंदू भाविकांची गैरसोय झाली त्यांना काकड आरतीचा आनंद घेता आला नाही असा गुप्तचार खात्याचा अहवाल असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं. मशिदीवरील भोंग्याचा विषय पुढे करुन भाजपने आणि त्यांच्या उपवस्त्राने हिंदुंचा गळा घोटला हे स्पष्ट झाल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला.

हजारो लोकांनी तक्रार केल्या आहेत, आमच्यावर अन्याय का होतो. शिर्डीतील हजारो लोकांनी नाराजी व्यक्त केली. हिंदुत्वासाठी आणि श्रद्धाळूंसाठी आजचा दिवस हा काळा दिवस असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 

ज्यांनी हे आंदोलन सुरु केलं आहे त्याविरुद्ध आता हिंदुंमध्या जागृती होतेय, आणि हिंदुच रस्त्यावर उतरले तर आश्चर्य वाटणार नाही, पण हिंदुंनी संयम राखावा असं आवाहन संजय राऊत यांनी केलं.

भोंग्याचा नियम पाळायचा असेल तर सर्व धर्मियांसाठी आहे. याचा सर्वात जास्त फटका हा हिंदु धर्मियांना बसला आहे. मशिदीवरील भोंग्याचं काय करायचं हे कोण एक व्यक्ती घेऊ शकत नाही, त्यासाठी कायदा आहे असा इशाराही संजय राऊत यांनी दिला.

हिंदुंमध्ये फूट पाडण्याचं कारस्थान असून यामागे भाजपचा हात आहे. भाजपने पुन्हा एकदा राज ठाकरेंचा बळी दिला आहे. जी गोष्ट भाजपला जमत नाही अशा गोष्टी भाजप लहान पक्षांना हाताशी धरून करत असते. आज पुन्हा एकदा हे स्पष्ट झालं. भाजपने राज ठाकरेंचा वापर करुन त्यांचा बळी दिल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय.

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
BJP trapped raj thackray for politics says sanjay raut
News Source: 
Home Title: 

'राजकारणासाठी भाजपने राज ठाकरे यांचा बळी दिला' 

'राजकारणासाठी भाजपने राज ठाकरे यांचा बळी दिला'
Yes
No
Facebook Instant Article: 
Yes
Mobile Title: 
'राजकारणासाठी भाजपने राज ठाकरे यांचा बळी दिला'
Publish Later: 
No
Publish At: 
Wednesday, May 4, 2022 - 14:31
Created By: 
Rajiv Kasle
Updated By: 
Rajiv Kasle
Published By: 
Rajiv Kasle
Request Count: 
1
Is Breaking News: 
No