मी राजेपण दाखवल्यामुळेच चंद्रकांत पाटील पदवधीर मतदारसंघातून निवडून आले- उदयनराजे

कोल्हापूर: राजाने राजेपणाचा आब राखून राहावं, अशी टीका करणारे भाजप नेते चंद्रकांत पाटील यांचा उदयनराजे भोसले यांनी समाचार घेतला. उदयनराजे यांनी कोल्हापूरमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील यांच्यावर बोचरी टीका केली. उदयनराजे यांनी म्हटले की, देशात लोकशाही असली तरी मी मनाने राजा आहे. तुम्ही पदवीधर मतदारसंघातून निवडणुकीसाठी उभे राहिलात तेव्हा आम्ही राजेपण दाखवत तुम्हाला मदत केली. त्यामुळेच तुम्ही निवडून आलात, हे ध्यानात राहू द्या. आता मला यावर अधिक काही बोलायचे नाही, असे उदयनराजे भोसले यांनी सांगितले. 

उदयनराजे भोसले यांची संपत्ती पाहा किती आहे?

दरम्यान, या पत्रकार परिषदेत उदयनराजे भोसले यांनी मतदारसंघातील विकास कामाचा निर्धारनामा प्रसिद्ध केला. पुढील पाच वर्षातील कामाचे नियोजन आम्ही केले आहे. नियोजित वेळेत प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. अनेक मोठी विकास कामे मार्गी लावली. यापुढे कमी पडणार नाही तसेच शेती, पाणी, आरोग्य, इंडस्ट्रीयल, शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पाच वर्षात काम केले जाणार असल्याचे यावेळी उदयनराजे यांनी सांगितले. 

शिवेंद्रसिंह भोसले यांच्यावरही टीका

दुसऱ्याच्या अंगावर चिखलफेक करण्यासाठी अक्कल लागत नाही. स्वतः काही करायचे नाही आणि कोणी काही करीत असेल, तर त्याला आडवे यायचे. निवडणुकांच्या काळातील जाहीरनाम्यातील एकेक गोष्ट आम्ही पूर्णत्वास नेत आहोत. तुम्ही ४२ वर्षांत काय केले आणि आम्ही काय करतोय हे एकदा समोरासमोर होऊन जाऊ द्या. नुसती दाढी वाढवून काही होत नाही,' असा घणाघात खासदार उदयनराजे भोसले यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावर केला.

 

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
Udayanraje take a dig on Chandrakant Patil
News Source: 
Home Title: 

मी राजेपण दाखवल्यामुळेच चंद्रकांत पाटील पदवधीर मतदारसंघातून निवडून आले- उदयनराजे

मी राजेपण दाखवल्यामुळेच चंद्रकांत पाटील पदवधीर मतदारसंघातून निवडून आले- उदयनराजे
Yes
No
Facebook Instant Article: 
Yes
Mobile Title: 
मी राजेपण दाखवल्यामुळेच चंद्रकांत पाटील पदवधीर मतदारसंघातून निवडून आले- उदयनराजे
Publish Later: 
No
Publish At: 
Tuesday, April 16, 2019 - 17:37