राज्यात कोरोनाग्रस्त रूग्णांची शंभरी पार, १०१ लोकांना लागण

मुंबई : कोरोनाग्रस्त रूग्णांच्या संख्येने राज्यात शंभरचा आकडा गाठला आहे. राज्यात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या ही १०१ वर पोहोचली आहे. आतापर्यंत कोरोनामुळे राज्यात तीन लोकांनी आपला जीव गमावला आहे. तसेच समाधानकारक बाब म्हणजे मुंबईतील कोरोनाग्रस्त असलेल्या १२ रूग्णांची तपासणी केली आहे. महत्वाची बाब म्हणजे या रूग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून हे रूग्ण ठणठणीत बरे झाल्याची माहिती मिळत आहे. 

महत्वाची बाब म्हणजे ३१ मार्चपर्यंत सरकारने संचारबंदी आणली आहे. पण नागरिक याकडे पाठ फिरवताना दिसत आहे. सोमवारी आणि मंगळवारी सकाळी नागरिक आपल्या खासगी वाहनांसोबत रस्त्यावर उतरलेले दिसले. एवढंच नव्हे तर मुंबई आणि पुणे भाजी मार्केटमध्ये सर्रास फिरताना दिसत आहेत. 

जगभरात कोरोनाग्रस्तांचा आकडा पावणे चार लाखांच्या वर गेला असून मृतांचा आकडाही साडेसोळा हजाराच्या जवळ पोहचला आहे. इटलीमध्ये मृतांचा आकडा वाढतच असून एका दिवसात ६०० हून अधिक लोकांचा मृत्यू झालाय. अमेरिकेतही मृतांचा आकडा ५५० च्या जवळ पोहचला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव जगभरात फारच वेगानं होत आहे. युरोप आणि अमेरिकेत रोज शेकडो मृत्यू होत आहेत. इटलीमध्ये कोरोनाचा कहर सुरुच असून २४ तासांत आणखी ६०१ बळी गेले. इटलीत कोरोनाबाधितांची संख्या ६४ हजाराच्या घरात पोहचली असून मृतांचा आकडा ६०७७ इतका झाला आहे.

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
Coronavirus : Maharashta count rises to 101 covid 19 Patients
News Source: 
Home Title: 

राज्यात कोरोनाग्रस्त रूग्णांची शंभरी पार, १०१ लोकांना लागण

राज्यात कोरोनाग्रस्त रूग्णांची शंभरी पार, १०१ लोकांना लागण
Yes
No
Facebook Instant Article: 
Yes
Mobile Title: 
राज्यात कोरोनाग्रस्त रूग्णांची शंभरी पार, १०१ लोकांना लागण
Publish Later: 
No
Publish At: 
Tuesday, March 24, 2020 - 11:36