जालन्यात पाणीटंचाईवरून भाजप-काँग्रेसमध्ये राजकारण

नीतेश महाजन, झी-मीडिया, जालना : जालना शहरात सध्या पाणीबाणी पाहायला मिळते आहे. जायकवाडी योजनेचं पाणी शहरात येऊनही जालना शहरातील नागरिकांना एक-एक महिना पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे शहरातील पाणीटंचाई ही कृत्रिम असून पालिकेच्या गलथान कारभारामुळे ही परिस्थिती उधभवली असल्याचा आरोप भाजपने केला आहे. दरम्यान काँग्रेस आणि भाजप पाणीप्रश्नावरून एकमेकांवर टीका करत आहेत.

जायकवाडी योजनेचं पाणी मिळूनही जालना शहरात दुचाकीवरून पाणी वाहून नेण्याची वेळ शहरातील नागरीकांवर आली. पाण्याची गरज भागवायची असेल तर अवघा दिवस दुचाकीवरून पाणी वाहून न्यावं लागतं. नाहीतर विकतचं पाणी टँकरने तरी घ्यावं लागतं अशी बिकट परिस्थिती जालन्यातील नागरीकांवर आली आहे. त्यामुळे शहराची तहान सध्या फक्त टँकरच्या पाण्यावरच अवलंबून आहे. पण सर्वसामान्य नागरिकांना दररोज टँकर घ्यायला पैसे आणायचे कोठून हा प्रश्न सतावतो आहे. त्यामुळे त्यांच्या आक्रोशानं शहरातील पाणीबाणी सध्या चर्चेचा विषय बनली आहे.

जालना शहराला जायकवाडीतून सध्या 24 एमएलडी पाण्याचा उपसा होतो. त्यातून 4 एमएलडी पाणी अंबड शहराला दिल्या जातं. म्हणजे 20 एमएलडी पाणी जालना शहराला मिळत. पण अंबड ते जालना दरम्यान असलेल्या जायकवाडी योजनेच्या व्हॉल्व्हला ठिकठिकाणी गळती लागल्यानं 2 एमएलडी पाणी वाया जातं. परिणामी 18 एमएलडी पाणी शहराला मिळतं. पण संपूर्ण शहरात अंतर्गत पाणीपुरवठा करणारी निजामकालीन पाईपलाईन काढून नवीन पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू असून ते प्रगती पथावर आहे. शिवाय जलकुंभ देखील उभारण्याचे काम प्रस्तावित आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना पाणी मिळत नाही. त्यामुळे शहरांतर्गत पाणीपुरवठा पूर्णतः विस्कळीत झाला आहे.

जालना पालिका केवळ नियोजनाअभावी शहरातील नागरीकांना पाणीपुरवठा करण्यात अपयशी ठरली आहे. पालिकेचा कारभार मनमानी असल्यानं पाणीपुरवठयासंदर्भात पालिकेची एकही बैठक झाली नाही. त्यामुळे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन शहरातील प्रत्येक वार्डात टँकरने पाणीपुरवठा करण्याचे आदेश दिल्याचं सांगत भाजपने पालिकेच्या कृत्रिम पाणीटंचाई विरोधात लाक्षणिक उपोषण केलं. पालिकेच्या मनमानी कारभाराचा निषेध नोंदवला. शिवाय जोपर्यंत पाणीटंचाई दूर केली जात नाही तोपर्यंत भाजपचे आंदोलनं सुरूच राहतील असंही भाजप गटनेत्यांचं म्हणणं आहे.

भाजपचं लाक्षणिक उपोषण सुरू झाल्यानं माजी आमदार कैलास गोरंटयाल यांनीही भाजपला टार्गेट केलं. जायकवाडी योजनेतून पाणी चोरी होते. त्यावर फक्त काँग्रेसच बोलते. यावर इतर कोणीही बोलत नाही. असा दावा त्यांनी केली आहे. शिवाय पाणीपुरवठा योजनेतील अडचणी दूर केल्यास पाण्याची अडचण दूर होईल असंही त्यांनी म्हटलं आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून शहराची तहान मिटलेली नाही. त्यामुळे विकतच्या टँकरच्या पाण्यावरच जालन्यातील नागरीक आजघडीला अवलंबून आहेत. अशा परिस्थितीत अंतर्गत जलवाहिनीच्या कामाला वेग देऊन जायकवाडी प्रकल्पापासून जालना शहरपर्यंतची गळती रोखणं गरजेचं आहे. याकडे नेते आणि प्रशासनाने लक्ष दिल्यास जालना शहराला एक-एक महिन्या ऐवजी तिसऱ्या दिवशी पाणी मिळू शकतं.

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
Congress and BJP politics on water issue in Jalna
News Source: 
Home Title: 

जालन्यात पाणीटंचाईवरून भाजप-काँग्रेसमध्ये राजकारण

जालन्यात पाणीटंचाईवरून भाजप-काँग्रेसमध्ये राजकारण
Yes
No
Facebook Instant Article: 
Yes
Mobile Title: 
जालन्यात पाणीटंचाईवरून भाजप-काँग्रेसमध्ये राजकारण
Publish Later: 
No
Publish At: 
Tuesday, May 21, 2019 - 16:37