गडचिरोलीत बॉम्बस्फोट, ३ पोलीस जखमी
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात कोरची तालुक्यातल्या बॉम्ब स्फोटात ३ पोलीस जखमी झाले. या घटनेनं पोलीस दलात खळबळ उडालीय.
बॅनरखाली बॉम्बस्फोट
कोरचीपासून १ किमी अंतरावर असलेल्या पकनाभट्टी गावाजवळ एका पुलाजवळ नक्षलवाद्यांनी एक बॅनर लावला होता. तो काढण्यासाठी कोरची पोलीस ठाण्याचं पथक तिथे पोहचलं. बॅनरखाली असलेल्या प्रेशर बॉम्बचा अचानक स्फोट झाला.
तीन पोलीस जखमी
यात एक अधिकारी आणि २ जवान जखमी झाले. जखमींना अधिक उपचारासाठी हेलिकॉप्टरद्वारे नागपुरला रवाना करण्यात आलंय. नक्षली बॅनर काढताना ज्या सूचनांचं पालन करणं आवश्यक असतं त्याचं पालन यावेळी झालंय का याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातंय.
English Title (For URL purpose only - Max 200 characters):
Bomb Blast in Gadchiroli, 3 Police injured
News Source:
Home Title:
गडचिरोलीत बॉम्बस्फोट, ३ पोलीस जखमी

Yes
No
Section:
Facebook Instant Article:
Yes
Highlights:
गडचिरोलीत बॉम्बस्फोट, ३ पोलीस जखमी
या घटनेनं पोलीस दलात खळबळ उडालीय
बॅनरखाली प्रेशर बॉम्बचा अचानक स्फोट
Mobile Title:
गडचिरोलीत बॉम्बस्फोट, ३ पोलीस जखमी