शरीर सुखाच्या मागणीला विरोध केल्यानं महिलेसह कुटुंबियांना जबर मारहाण

विष्णू भुर्गे झी मीडिया बीड: शरीर सुखाच्या मागणीला विरोध करणाऱ्या महिलेसह तिच्या कुटुंबाला जबरदस्त मारहाण करण्यात आली. हा धक्कादायक प्रकार महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील दिंद्रुडमध्ये घडला आहे. 

शरीरसुखाच्या मागणीला विरोध केल्याने महिलेसह कुटुंबातील लोकांना मारहाण करण्यात आली. शेतात महिला एकटी काम करत आहे हे पाहून संधी साधली. या व्यक्तीने तिला शरीरसुखाची मागणी केली. त्यावेळी महिलेनं विरोध केला आणि वाद झाला. हा वाद सुरू असताना कुटुंबातील लोक मध्यस्तीला धावू आले, त्यावेळी घरातील वृद्ध दांपत्याना मारहाण केली. 

आरोपसह 5 जणांनी पीडित कुटुंबाला काठ्या आणि लाथा बुक्क्यांनी जबरदस्त मारहाण केली. ही धक्कादायक घटना बीड जिल्ह्यात घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या घटन नंतर दिंद्रुड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

आरोपीच्या शोधात 2 पोलीस पथक रवाना झाली आहेत. मारहाणीमध्ये वृद्ध दाम्पत्य गंभीर जखमी कुटुंबातील काही जणांवर अंबेजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू. 

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
beed women and her family beatten from 5 people crime news
News Source: 
Home Title: 

शरीर सुखाच्या मागणीला विरोध केल्यानं महिलेसह कुटुंबियांना जबर मारहाण

शरीर सुखाच्या मागणीला विरोध केल्यानं महिलेसह कुटुंबियांना जबर मारहाण
Yes
No
Facebook Instant Article: 
Yes
Mobile Title: 
शरीर सुखाच्या मागणीला विरोध केल्यानं महिलेसह कुटुंबियांना जबर मारहाण
Publish Later: 
No
Publish At: 
Monday, July 12, 2021 - 16:41
Request Count: 
1
Is Breaking News: 
No