पोलीस दलातील रॉकी श्वानाचे निधन, अनिल देशमुखांची भावनिक पोस्ट

बीड : बीड पोलीस दलातील रॉकी नामक श्वानाचे काल दीर्घ आजाराने निधन झाले.  यानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्वीट करत शोक व्यक्त केला. 'रॉकी'च्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला. 

रॉकीने आजपर्यंत ३६५ गुन्हे उघडकीस आणण्यात मोलाची भूमिका बजावली होती. बीड पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारा एक प्रामाणिक योद्धा आम्ही रॉकीच्या जाण्याने गमावल्याचे देशमुख आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले.

रॉकीच्या निधनाचे वृत्त मन हेलावून टाकणारे आहे. रॉकीने केलेली कामगिरी माझ्यासह बीड पोलीस दलाच्या मनात सदैव घर करून राहील असे ते म्हणाले.

दहशतवादी हल्ले, बॉम्बशोधक, बॉम्बनाशक पथके, गुन्ह्यांची उकल आणि सभा बंदोबस्त इ. विषयांच्या संदर्भात महाराष्ट्र पोलीस दलातील श्वानपथक महत्वाची भूमिका बजावत असते. 

महाराष्ट्र पोलीस दलातील तंत्रशुद्ध प्रशिक्षणाने तयार झालेले श्वान हजारो नागरिकांचे जीवन वाचविण्याचे काम करत आले आहेत. 

रॉकीच्या आत्म्यास चिरशांती लाभो अशी मी ईश्वराजवळ प्रार्थना करतो अशा शब्दात त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली.  

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
Beed Police Department Rocy Dog dies, Home minister Anil Deshmukh tweet
News Source: 
Home Title: 

पोलीस दलातील रॉकी श्वानाचे निधन, अनिल देशमुखांची भावनिक पोस्ट

पोलीस दलातील रॉकी श्वानाचे निधन, अनिल देशमुखांची भावनिक पोस्ट
Yes
No
Facebook Instant Article: 
Yes
Mobile Title: 
पोलीस दलातील रॉकी श्वानाचे निधन, अनिल देशमुखांची भावनिक पोस्ट
Publish Later: 
No
Publish At: 
Sunday, August 16, 2020 - 14:53
Request Count: 
1