कौटुंबिक वादातून पत्नी, सासरा, मेहुण्याची क्रूर हत्या

अकोला : अकोला जिल्ह्यामधलं बाळापूर शहर बुधवारी रात्री तिहेरी हत्याकांडानं हादरलं. बाळापुरातल्या आबादनगर इथे जावयानं आपल्या पत्नीसह सासरा आणि मेहुण्याची हत्या केली. कौटुंबिक वादातून या हत्या झाल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिलीय. रात्री एक वाजल्याच्या सुमारास हे हत्याकांड घडलं. अकोला जिल्ह्यातल्या परंडा इथल्या सय्यद फिरोज याचा कौटुंबिक कारणावरून पत्नीशी वाद होता. याच वादातून सय्यद फिरोजनं सासरी बाळापूर इथे जाऊन तिघांची हत्या केली. 

मृतांमध्ये सय्यद फिरोजची पत्नी शबाना, सासरा मेहबूब खान आणि मेहुणा मोहम्मद फिरोज यांचा समावेश आहे. हत्या करुन फरार झालेल्या सय्यद फिरोजला सकाळी बार्शी टाकळी इथून पोलिसांनी अटक केली.  

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
akola triple murder
News Source: 
Home Title: 

कौटुंबिक वादातून पत्नी, सासरा, मेहुण्याची क्रूर हत्या 

कौटुंबिक वादातून पत्नी, सासरा, मेहुण्याची क्रूर हत्या
Yes
No
Facebook Instant Article: 
Yes
Mobile Title: 
कौटुंबिक वादातून पत्नी, सासरा, मेहुण्याची क्रूर हत्या