धर्मांतर प्रकरणात मोठा खुलासा, अल्पवयीन मुलगा आणि मौलवी दरम्यानचा WhatsApp चॅट समोर

UP Crime News: गाझियाबादमध्ये (Ghaziabad) अल्पवयीन मुलाच्या धर्मांतराचा (Religious Conversion) प्रयत्न झाल्याचं प्रकरण समोर आलं होतं. या प्रकरणाता आता नवा खुलासा झाला आहे. अल्पवयीन मुलगा आणि मौलवीदरम्यान व्हॉट्सअॅपवर झालेला संवाद (WhatsApp Chat) पोलिसांच्या हाती लागला आहे. यात मौलवी त्या मुलाला नमाज अदा करण्याविषयी काही सूचना देत आहे. हा व्हॉटसअॅप चॅट डिसेंबर 2022 मधला आहे. या चॅटमध्ये मुलगा मी शाळेत असल्याने नमाज अदा करु शकत नसल्याचं सांगतो. यावर मौलवींनी उत्तर देताना आज शुक्रवार आहे, शुक्रवारची नमाज अदा करणे खूप महत्त्वाचं असल्याचं सांगतो.

धर्मांतराच्या जाळ्यात अडकला
अल्पवयीन मुलगा आणि मौलवी यांच्या चॅटवरुन तो मुलगा धर्मांतराच्या जाळ्यात पूर्णपण अडकला असल्याचं स्पष्ट होतं, असं पोलिसांनी सांगितलं. इतकंच नाही जैन समाजातील हा मुलगा आपल्या इतर मित्रांनाही इस्लाम धर्माबाबत माहिती देत होता. धर्मांतरचं प्रकरण समोर आल्यानंतर त्या मुलाकडे चौकशी करण्यात आली. पण आता तो मुलगा आपल्या धर्मात परतण्यास तयार नाही. आपल्या खोलीत स्वत:ला कोंडून घेत तो नमाज पढत असतो असं त्याच्या घरच्यांनी सांगितलं. या मुलाला समुपदेशनाची गरज असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. 

गाझियाबाद धर्मांतराचं महाराष्ट्र कनेक्शन समोर आल्यानंतर उत्तर प्रदेश पोलीसांनी (Uttar Pradesh Police) महाराष्ट्रात तळ ठोकला आहे. ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा (Mumbra) इथल्या भागात तपास सुरु आहे. या प्रकरमातील मुख्य आरोपी शाहनवाज खानच्या शोधासाठी विशेष पथक मुंब्रा इथं आलं आहे.  शाहनवाज याचा कसून शोध सुरू असल्याची माहिती ठाणे पोलीस सूत्रांनी दिलीय. 

दरम्यान गाझियाबाद पोलिसांनी शाहनवाचज खान उर्फ बद्दो, मशिदीचे मौलवी अब्दुल रहमान आणि आणखी दोन जणांच्या बँक खात्यांचा तपास सुरु केला आहे. तब्बल 20 बँक खात्यांचा शोध पोलिसांकडून सुरु आहे. शाहनवाज खानच्या बँक ट्रान्झाक्शनचे डिटेल पोलिसांच्या हाती लागले आहे. याचा तपास सुरु आहे. 

असा होता ऑनलाईन गेम
मुंब्रा भागात राहाणारा शाहनवाज मकसूद खान उर्फ बद्दो हा बनावट युजर आयडी बनवून त्या माध्यमातून तो मुलांना ऑनलाईन गेम खेळण्यासाठी उपलब्ध करून देत होता. या गेम मध्ये हरलेल्या हिंदू मुलांना तो कलमा वाचायला सांगून इस्लाम कबुल करण्यास भाग पडत होता.  कलमा वाचल्यानंतर तुम्ही कधीही गेम हरणार नसल्याचं अमिष दाखवत होता. मुंब्रा येथील देवरी पाडा इथं असलेल्या शाझिया इमारतीच्या पहिल्या मजल्यावर शाहनवाज मकसूद आपल्या कुटुंबासोबत राहातो. सध्या तो फरार आहे.

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
religious conversion ghaziabad case student and maulavi whatsapp chat link viral
News Source: 
Home Title: 

धर्मांतर प्रकरणात मोठा खुलासा, अल्पवयीन मुलगा आणि मौलवी दरम्यानचा WhatsApp चॅट समोर

धर्मांतर प्रकरणात मोठा खुलासा, अल्पवयीन मुलगा आणि मौलवी दरम्यानचा WhatsApp चॅट समोर
Yes
No
Section: 
Facebook Instant Article: 
Yes
Mobile Title: 
धर्मांतर प्रकरणात मोठा खुलासा, अल्पवयीन मुलगा आणि मौलवी दरम्यानचा WhatsApp चॅट समोर
Publish Later: 
No
Publish At: 
Saturday, June 10, 2023 - 19:52
Created By: 
Rajiv Kasle
Updated By: 
Rajiv Kasle
Published By: 
Rajiv Kasle
Request Count: 
1
Is Breaking News: 
No
Word Count: 
313