राकेश झुनझुनवाला यांची TATA Group च्या 'या' कंपनीत आणखी मोठी गुंतवणूक; तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का?

मुंबई : भारतीय शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांनी टाटा ग्रुपवर पुन्हा विश्वास दाखवला आहे. तुम्हीही शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास इच्छुक असाल तर, टाटा ग्रुपच्या या शेअरचा विचार करू शकता. 

मागील एका वर्षात 150 टक्के रिटर्न्स

मार्च 2022 मध्ये जारी झालेल्या तिमाहीमध्ये राकेश झुनझुनवाला यांची इंडियन हॉटेल्समध्ये एकूण गुंतवणूक 2.12 टक्के इतकी होती. हा शेअर गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर ठरला आहे. मागील एका वर्षात 150 टक्क्यांहून अधिक रिटर्न्स दिले आहेत.

राकेश झुनझुनवाला यांनी BSE वर सध्याच्या मार्च 2022 तिमाहीच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार इंडियन हॉटेल्समध्ये 1.11 टक्के (1,57,29,200 इक्विटी शेअर्स) आहेत. डिसेंबर 2021 च्या तिमाहीत त्यांच्याकडे इंडिया हॉटेल्सचे 1,42,79,200 शेअर्स होते. यावरून स्पष्ट होते की,  बिग बुलने जानेवारी-मार्च तिमाहीत इंडिया हॉटेल्स कंपनी लिमिटेडचे आणखी ​​14.50 लाख शेअर्स खरेदी केले आहेत.

वर्षात 30 टक्क्यांहून अधिक वाढ

टाटा समूहाची कंपनी इंडियन हॉटेल्सचा शेअर गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर ठरला आहे. गेल्या एका वर्षात या शेअरने सुमारे 153 टक्के परतावा दिला आहे.

 21 एप्रिल 2022 रोजी, BSE वर शेअरची किंमत 244.25 रुपयांवर ट्रेड होत होती. इंडियन हॉटेल्सच्या शेअर्सचा 52 आठवड्यांचा उच्चांक 260.30 रुपये आणि नीचांकी 90.89 रुपये आहे.

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
rakesh jhunjhunwala portfolio big bull purchase 14 5 lac share in tata group indian hotels
News Source: 
Home Title: 

राकेश झुनझुनवाला यांचा TATA Group च्या या कंपनीत मोठी गुंतवणूक; तुमच्याकडे आहे का?

राकेश झुनझुनवाला यांची TATA Group च्या 'या' कंपनीत आणखी मोठी गुंतवणूक; तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का?
Yes
No
Section: 
Facebook Instant Article: 
Yes
Mobile Title: 
राकेश झुनझुनवाला यांचा TATA Group च्या या कंपनीत मोठी गुंतवणूक; तुमच्याकडे आहे का?
Publish Later: 
No
Publish At: 
Friday, April 22, 2022 - 14:37
Request Count: 
1
Is Breaking News: 
No