दिल्लीत 'स्पेशल 26' सारखीच घटना, ED ऑफिसर बनून आले अन् 3 कोटींचा दरोडा टाकला

Fake ED officials raid At Delhi: राजधानी दिल्लीत दरोड्याचा एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. बाबा हरिदास नगर परिसरात हा प्रकार घडला आहे. ईडीचे अधिकारी असल्याचे सांगत एका कारमधून दरोडेखोर आले होते. आरोपींनी तब्बल 3.20 कोटींची लूटले आहेत. शुक्रवारी रात्री ही घटना घडली आहे. 

लुटीची घटना घडल्यानंतर लगेचच पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. पीसीआर व्हॅनला मिळालेल्या सुचनेनुसार आरोपींची एक कार रोखण्यात आली. त्यातून 70 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. नजफगड येथील रहिवासी सुंदर हा गुरुग्रामयेथील एका खासगी बँकेत काम करतो. त्याने गालिबपूर येथील त्याच्या गावातील जमिनीचा व्यवहार 4.70 कोटींना केला होता. एक महिन्यापूर्वीच त्याला 3.20 कोटींची रोख रक्कम आणि उरलेले 47 व 69 लाख रुपयांचा चेक देण्यात आला. पीडीतेने सगळी रोख रक्कम घरातच ठेवली होती. 

पीडीत तरुणाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री 8च्या सुमारास घराजवळच असलेल्या हॉटेलमध्ये जेवण्यासाठी गेला होता. त्याचवेळी दोन कारमधून 5-6 जण त्याच्याजवळ आले होते. त्यांनी ईडीचे अधिकारी असल्याची बतावणी करुन जबरदस्ती त्यांच्या कारमध्ये बसवण्यात आले. त्यानंतर जवळपास दोन तास आरोपी त्याला कारमधून फिरवत होते. त्याला धमकीदेखील देण्यात आली होती, असं त्याने तक्रारीत म्हटलं आहे. 

दोन तास कारमध्ये फिरवल्यानंतर आरोपी पीडित तरुणाला त्याच्या घरी घेऊन गेले. त्यानंतर तुमच्याकडे बेकायदेशीर रक्कम असून ती जप्त करण्याचे आदेश आहेत, असं त्याला सांगण्यात आले. आरोपींनी सुंदरच्या घरातील बेडमधून 3.20 कोटींची रक्कम काढून घेऊन गेले. त्यानंतर आरोपीनी सुंदरला एका पेट्रोल पंपाजवळ सोडून निघून गेले. सुंदरने लगेचच पोलिसांना फोन करुन घडलेल्या घटनेची माहिती दिली. 

तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी नरेला परिसरात कार थांबवून 70 लाखांची रोख रक्कम ताब्यात घेतली. आरोपी कार चालकाची ओळख पटली असून अमित असे त्याचे नाव आहे. अमित याने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, फौजी नावाच्या एका व्यक्तीने चार-पाच मुलांना घेऊन येण्यास सांगितले होते. तसंच, लुटीचे पैसे सगळ्यांमध्ये वाटून टाकण्यात आले आहेत. 

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
Fake ED officials raid Delhi home & seize Rs 3 crore
News Source: 
Home Title: 

दिल्लीत 'स्पेशल 26' सारखीच घटना, ED ऑफिसर बनून आले अन् 3 कोटींचा दरोडा टाकला

दिल्लीत 'स्पेशल 26' सारखीच घटना, ED ऑफिसर बनून आले अन् 3 कोटींचा दरोडा टाकला
Caption: 
Fake ED officials raid Delhi home & seize Rs 3 crore
Yes
No
Section: 
Facebook Instant Article: 
Yes
Authored By: 
Mansi kshirsagar
Mobile Title: 
दिल्लीत 'स्पेशल 26' सारखीच घटना, ED ऑफिसर बनून आले अन् 3 कोटींचा दरोडा टाकला
Publish Later: 
No
Publish At: 
Sunday, October 15, 2023 - 14:57
Created By: 
Manasi Kshirsagar
Updated By: 
Manasi Kshirsagar
Published By: 
Manasi Kshirsagar
Request Count: 
1
Is Breaking News: 
No
Word Count: 
265