भर मंडपात वधूने मारली कानफटात ...

मुंबई : भारतामध्ये लग्न हा मोठा सोहळा असतो. त्यामध्ये अनेक संस्कारांचा, रीतींचा समावेश असतो. आजकाल लग्नामध्ये वरमाला घालताना एक खास स्पर्धा रंगते. कोण अधिक उंचावर जातं आणि समोरची व्यक्ती त्याच्यागळयात कसा हार घालते? 

सोशल मीडियामध्ये व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये या सोहळ्यात मस्करीची कुस्करी कशी होते? हे व्हायरल होत आहे.  

 

हा व्हिडिओ नेमका कुठचा आहे? याबाबत माहिती मिळालेली नाही. मात्र वरमाळा घालताना वराला एकाने उचलून घेतले. त्यानंतर वधूला त्याला हार घालण्यासाठी कोणीतरी उचलून घेणं गरजेचे होते. म्हणून एक व्यक्ती पुढे सरसारवली. दोघांनीही हार घातले. मात्र वधूला खाली उतरवल्यानंतर तिने त्याच व्यक्तीच्या कानशिलात मारल्याने उपस्थित मंडळी या प्रसंगाकडे पाहतच 
राहिले. 

काहींच्या मते, वधूला उचलून घेणारी व्यक्ती तिचा भावोजी होता. वधूने त्याच्या कानशिलात मारल्यानंतर त्यानेदेखील पत्नीला मारल्याचे व्हिडिओमध्ये कैद झाले आहे.  

सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओवर नेटकरांनी आपली मतं व्यक्त केली आहेत. त्यानुसार, काहींनी वधूचे समर्थन केले आहे तर काहींना तिला इतका का राग आला असावा ? याबाबत आपली मतं मांडली आहेत.  

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
bride slaps relative on her wedding day
News Source: 
Home Title: 

भर मंडपात वधूने मारली कानफटात ...

भर मंडपात वधूने मारली कानफटात ...
Yes
No
Section: 
Facebook Instant Article: 
Yes
Mobile Title: 
भर मंडपात वधूने मारली कानफटात ...