BHU मध्ये पुन्हा एकदा विद्यार्थिनीची छेडछाड!

उत्तरप्रदेश : बनारस हिंदू विद्यापीठ आंदोलनानंतरही विद्यार्थीनींसाठी सुरक्षित झालेली नाही. पुन्हा एकदा विद्यापीठाच्या परिसरात एका विद्यार्थिनीसोबत छेडछाड आणि गंभीर मारहाणीची घटना घडलीय. 

काही दिवसांपूर्वीही बनारस हिंदू विद्यापीठात विद्यार्थिनींसोबत छेडछाड करण्यात आली होती... याविरोधात विद्यार्थ्यांनी जोरदार आंदोलन केलं होतं. ही घटना शांत होते न होतेच तोवरच समाजशास्त्र विभागाचं शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीसोबत छेडछाड करण्यात आल्याचं समोर येतंय. 

आरोपीनं केवळ विद्यार्थिनीसोबत छेडछाड केली नाही तर तिनं विरोध केल्यानंतर वर्गात घुसून तिला मारहाणही केली... आणि तिचा मोबाईलचीही नासधूस केली. पीडिता विवाहीत स्त्री आहे. 

या घटनेनंतर विद्यार्थिनीनं युनिव्हर्सिटीच्या प्रॉक्टोरियल बोर्डाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवलीय. अधिकाऱ्यांनी या प्रकरणी पीडित मुलीसोबत पोलिसांशी संपर्क साधून या प्रकरणाची रितशीर तक्रार दाखल केली. त्यानंतर आरोपी तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. 
 

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
bhu girl molested and beaten again
News Source: 
Home Title: 

BHU मध्ये पुन्हा एकदा विद्यार्थिनीची छेडछाड!

BHU मध्ये पुन्हा एकदा विद्यार्थिनीची छेडछाड!
Caption: 
फाईल फोटो
Yes
No
Section: 
Facebook Instant Article: 
Yes