गुगलकडून 65 लाख रुपयांच्या नोकरीची ऑफर, एक्सपर्ट म्हणतात स्वीकारू नकोस!

Google Package Viral: सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. कधी कोणता डान्स सर्वांच लक्ष वेधन घेतो, कोणत्यातरी मजेशीर व्हिडीओवर खूप सारे व्ह्यूज असतात. तर कधी नोकरी, पगार अशासंबंधी पोस्टदेखील अचानक व्हायरल होऊ लागतात. सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट खूप व्हायरल होतेय. ज्याध्ये बंगळूरच्या सॉफ्टवेअर इंजिनीअरला लोकं सल्ला देतायत. या सॉफ्टवेअर इंजिनीअरला गुगलकडून 65 लाख रुपयांचे पॅकेज ऑफर करण्यात आले आहे. त्याने यासंदर्भात पोस्ट टाकली पण लोकांना हा पगार खूपच कमी वाटतोय.  टेक वर्ल्ड यूजर्सनुसार हे पॅकेज काही चांगले नाही.तुझ्यासारख्या जास्त अनुभव असलेल्या व्यक्तीला आणखी मोठं पॅकेज असावं, असं त्याला लोकं सांगतायत. 

65 लाखांचे पॅकेज 

कार्तिक जोलपारा हा तरुण अमेरिकी मल्टी नॅशनल कंपनी जेपी मॉर्गनमध्ये डेव्हलपर कंपनीत डेव्हलपर म्हणून काम करतोय. त्याच्याकडे 10 वर्षांहून अधिक अनुभव आहे. त्याला गुगलमधून 65 लाख पॅकेज ऑफर करण्यात आले आहे. यानंतर जोलपाराने अनोळखी प्रोफाइलवरुन गुगलने दिलेल्या जॉब ऑफरचा स्क्रिनशॉट शेअर केलाय.

10 वर्षांचा अनुभव तुम्हाला काय देतो? क्रेजी ऑफर! अशी कमेंट त्याने आपल्या पोस्टवर केली आहे. स्क्रिनशॉटमध्ये दिसत असलेल्या माहितीनुसार, हा तरुण थर्ड टियर काँलेज पास आऊट असून त्याच्याकडे 10 वर्षांचा अनुभव आहे. गूगलने सिनीयर सॉफ्टवेअर इंजिनीअर या पदासाठी 65 लाख वार्षिक पगारासोबत 9 लाख वार्षिक बोनस, 19 लाख साइनिंग बोनस आणि 5 लाखाचा रिलोकेशन बोनस ऑफर केला आहे. स्क्रिनशॉटनुसार, बंगळुरु बेस्ड इंजिनीअरने ही ऑफर मनापासून स्वीकारली आहे. 

सोशल मीडियात युजर्स जास्त खूष नाहीत 

एक्सवर या पोस्टला आतापर्यंत 1.2 लाखहून अधिकजणांनी पाहिलंय. साधारण 1.8 हजार लोकांनी पोस्ट लाइक केलीय. काही लोक तरुणाला मिळालेल्या ऑफरवरुन खूष नाहीत. एक यूजर म्हणतो, 'मी एकटाच आहे का जो या आकड्यापासून खूष नाही? टेकमध्ये हे सर्वसामान्य नाही का?' दुसरा युजर्स म्हणतो, 'इमानदारीने सांगायच तर मी हे आकडे पाहून जास्त प्रभावीत नाहीय. मी त्याच कंपनीच्या अनेक चांगल्या ऑफर पाहिल्या आहेत. पण मी खूष नाहीय. 10 वर्षाचा अनुभव आणि एल5 साठी खूप स्पेशलयाझेशन लागतं.' टेक जगताशी संबंधित नसलेल्या व्यक्तीदेखील या पोस्टवर तरुणाला सल्ला देत आहेत.

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
Bengaluru Engineer Gets Google package viral news Social Media Reacts
News Source: 
Home Title: 

गुगलकडून 65 लाख रुपयांच्या नोकरीची ऑफर, एक्सपर्ट म्हणतात स्वीकारू नकोस!

गुगलकडून 65 लाख रुपयांच्या नोकरीची ऑफर, एक्सपर्ट म्हणतात स्वीकारू नकोस!
Caption: 
सॉफ्टवेअर इंजिनीअरला गुगलकडून 65 लाखाचे पॅकेज ऑफर
Yes
No
Section: 
Facebook Instant Article: 
Yes
Authored By: 
Pravin Dabholkar
Mobile Title: 
गुगलकडून 65 लाख रुपयांच्या नोकरीची ऑफर, एक्सपर्ट्स म्हणतात स्वीकारू नकोस!
Publish Later: 
No
Publish At: 
Saturday, October 5, 2024 - 17:08
Created By: 
Pravin Dabholkar
Updated By: 
Pravin Dabholkar
Published By: 
Pravin Dabholkar
Request Count: 
1
Is Breaking News: 
No
Word Count: 
305