भारत बंदला उत्तर भारतात चांगला प्रतिसाद

नवी दिल्ली : अॅट्रॉसिटी कायद्याविरोधात आज दलित संघटनांनी पुकारलेल्या बंदला उत्तर भारतात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मध्यप्रदेशातल्या मुरैना शहरात पोलिसांच्या गोळीबारात एका आंदोलर्त्याचा मृत्यू झाला आहे. उत्तर भारतात अनेक शहरांमध्ये जमावावर पोलिसांनी लाठीमार केलाय. दलित संघटनांनी अनेक ठिकाणी उग्र आंदोलनं केली. बिहारची राजधानी पाटण्यात खासदार साधू यादव यांनी मोर्चा काढला. तर रांचीमध्ये झालेल्या आंदोलनात पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी लाठीमार केला. तर पंजाबच्या लुधियाना शहरात कडेकोट बंदोबस्तात कडकडीत बंद पाळण्यात आला. पंजाब सरकारनं सर्व शाळांना आज सुट्टी जाहीर केली आहे.  

बंदला चांगला प्रतिसाद

तिकडे केरळमध्येही दलित संघटना आणि डाव्या पक्षांनी पुकारलेल्या या बंदला चांगला प्रतिसाद मिळाला असून सामान्य व्यवहार ठप्प आहेत. सर्वोच्च न्यायालयात आज सरकारतर्फे निर्णयाच्या पुनर्विचारासाठी याचिका दाखल करण्यात येणार आहे. पण गेल्या सुनावणीत सरकारच्या वतीनं करण्यात आलेले सगळे युक्तीवाद मागे घेऊन दलित अत्याचारांची स्थिती सरकारनं कोर्टापुढे मांडली नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा गुजरातमधील दलित नेते जिग्नेश मेवाणी यांनी दिला आहे. 

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
atrocity and agitation bharat bandh in north india
News Source: 
Home Title: 

भारत बंदला उत्तर भारतात चांगला प्रतिसाद

भारत बंदला उत्तर भारतात चांगला प्रतिसाद
Yes
No
Section: 
Facebook Instant Article: 
Yes
Mobile Title: 
भारत बंदला उत्तर भारतात चांगला प्रतिसाद