Viagraचा वापर शरीरावर करतोय मोठा परिणाम; समोर येतायत साईड इफेक्ट्स
मुंबई : सेक्स परफॉर्मेंस सुधारण्यासाठी जगातील अनेक देशांमध्ये व्हायग्रा सारखी औषधे वापरली जातात. हे औषध पुरुषांच्या लैंगिक क्षमतेशी निगडित आहे. ज्यांची कमकुवत लैंगिक क्षमता आहे, अशांना डॉक्टर ही औषधं घेण्याची शिफारस करतात. पण तुम्हाला माहित आहे का, की डॉक्टर स्वतः व्हायग्राचा वापर सुरक्षित मानत नाहीत.
ज्या लोकांनी व्हायग्रासारख्या औषधांचा वापर केला आहे त्यांचा दावा केला आहे की, यानंतर त्यांना बहिरेपणाच्या समस्येला सामोरं जावं लागतं. यूकेमध्ये व्हायग्रा घेतलेल्या नऊ लोकांनी नोंदवलं की, औषध वापरल्यानंतर गेल्या पाच वर्षांत त्यांना अधिक दुष्परिणामांना सामोरं जावं लागलंय.
प्लेबॉय बॉस म्हणून प्रसिद्ध असलेल्या ह्यू हेफनरने एकदा दावा केला होता की, व्हायग्राच्या अति वापरामुळे तो बहिरा झाला आहे. 2017 मध्ये वयाच्या 91 व्या वर्षी त्याचं निधन झालं.
लैंगिक परफॉर्मन्स सुधारण्यासाठी हे औषध वापरणाऱ्या इतर लोकांच्या म्हणण्याप्रमाणे बहिरेपण हा एक दुष्परिणाम आहे. व्हायग्रा वापरणाऱ्या तीन लोकांनी सांगितले की, त्यांना प्रायवेट पार्टशी संबंधित समस्यांचाही सामना करावा लागला. तर काहींनी बरेच तास वेदनांचीही तक्रार केली.
व्हायग्रा घेणाऱ्यांनी इतर अनेक दुष्परिणाम दिसत असल्याच्या तक्रारी केल्या आहेत. यामध्ये उलट्या होणं, बेशुद्ध होणं, पोटफुगी, पाठदुखी, गोंधळ आणि स्मरणशक्ती कमी होणं यासारखे दुष्परिणाम देखील दिसून आले आहेत. व्हायग्रा वापरणाऱ्या एका व्यक्तीने सांगितलं की, याचा वापर केल्याने दृष्टीवरही वाईट परिणाम झाला. याच्या वापरानंतर, सर्व ठिकाणी निळं दिसू लागत असल्याचं त्या व्यक्तीचं म्हणणं होतं.
तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, जेव्हा लोकं इरेक्टाइल डिसफंक्शन सारख्या समस्या असतात तेव्हा व्हायग्राचा वापर करतात. जोपर्यंत इरेक्टाइल डिसफंक्शनच्या तक्रारी समोर आल्यावर लोकं त्याच्या उपचारांसाठी व्हायग्राचा वापर करतील.
Viagraचा वापर शरीरावर करतोय मोठा परिणाम; समोर येतायत साईड इफेक्ट्स
