Aged like a fine wine; झिनत अमान यांच्या चेहऱ्यावर उतारवयातही इतका नूर कसा?

Zeenat Aman’s new photo : बॉलिवूड  मधील कधीही न विसरता येणारं नाव म्हणजे अभिनेत्री झिनत अमान (evergreen zeenat aman). 'सत्यम शिवम सुंदरम' या चित्रपटातून प्रेक्षकांपुढे आपल्या अभिनयाचा दमदार नमुना सादर करणाऱ्या अभिनेत्री झिनत अमान यांनी कायमच त्यांच्या रुपानंही चाहत्यांना वेड लावलं. तारुण्यात झिनत अमान जेवढ्या सुंदर होत्या तेवढ्याच आजही आहेत. झिनत अमान यांच्याकडे पाहिल्यानंतर कळतं खरं सौंदर्य म्हणजे हेच...(zeenat aman looks)
 
सध्या झिनत अमान यांचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. अभिनेत्री आकांशा पूरी (Akanksha Puri )ने झिनत यांच्यासोबत काही फोटो शेअर केले आहेत ज्यामध्ये झिनत प्रचंड सुंदर दिसत आहेत. (zeenat aman life story)
 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

 
आकांशाने झिनत यांच्यासोबत फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये 'सर्वात सुंदर, मोहक आणि आकर्षक व्यक्तिमत्त्वासोबत स्क्रीन शेअ केल्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजते. तुमच्या सदाबहार सौंदर्याने पूर्णपणे मंत्रमुग्ध झाली झीनत अमान मॅडम....' असं लिहिलं आहे. सध्या अभिनेत्री पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. (zeenat aman biography)
 
बॉलिवूडच्या सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक म्हणजे झिनच अमनय. झिनत यांच्यासारखीच आपलीही त्वचा असावी अशी प्रत्येक महिलेची इच्छा असते. त्यामुळे सुंदर दिसण्यासाठी तुम्हीही  काही टिप्स फॉलो करु शकता... 
 
सुंदर दिसण्यासाठी काय कराल... 
- रोज झोपण्यापूर्वी आपले डोळे गुलाबपाण्यानं स्वच्छ केल्यास ते स्वच्छ आणि चमकदार होतील.
 
- लिंबाच्या रसानं डोक्याची मालिश केल्यानं केसांचं पिकणं आणि गळणं कमी होतं. लिंबाच्या रसात सुकलेल्या आवळ्याचं चूर्ण मिसळून केसांना लावल्यानं केस काळे होतात. केसांच्या इतर तक्रारींवरही उपाय होतो.
 
- डोळ्यांभोवती क्रीम लावताना ते डोळ्यात जाणार नाही, याची काळजी घ्यावी. क्रीमचा वापर साधारणपणे रात्री झोपताना करावा.
 
- डोळ्याखालची काळी वर्तुळं घालविण्यासाठी चंदन आणि जायफळाची पेस्ट डोळ्यांभोवती रात्री लावून ठेवावी. सकाळी धुऊन टाकावे. यामुळं डोळ्यांना गारवा मिळून त्याखालील काळी वर्तुळं नाहीशी होतील.
 
- सावळेपणा दूर करण्यासाठी एक बादली पाण्यात एका लिंबाचा रस टाकावा. या पाण्यानं स्नान करण्यानं त्वचा उजळते.
English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
Zeenat Amans new photo at the age of 70
News Source: 
Home Title: 

Aged like a fine wine; झिनत अमान यांच्या चेहऱ्यावर उतारवयातही इतका नूर कसा?
 

Aged like a fine wine; झिनत अमान यांच्या चेहऱ्यावर उतारवयातही इतका नूर कसा?
Yes
No
Facebook Instant Article: 
Yes
Mobile Title: 
Aged like a fine wine; झिनत अमान यांच्या चेहऱ्यावर उतारवयातही इतका नूर कसा?
Publish Later: 
No
Publish At: 
Tuesday, November 8, 2022 - 13:49
Request Count: 
1
Is Breaking News: 
No