लग्नाच्या 6 महिन्यातच यामी गौतमकडून पतीबाबत मोठा खुलासा

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमने प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. तिने दमदार अभिनय आणि मेहनतीच्या जोरावर हे स्थान मिळवले आहे.

आज तिची गणना बॉलिवूडच्या बड्या अभिनेत्रींमध्ये केली जाते. अनेकदा असे दिसून येते की यामी गौतम अतिशय साध्या लूकमध्ये दिसते आणि लक्षपूर्वक पाहिले तर यामी बहुतेक वेळा मेकअपशिवाय दिसते. त्यामुळे तिच्या सिंपल स्वीट लूकमुळे ही ती चर्चेचा विषय ठरते. 

यामी गौतमचा जन्म 1988 मध्ये हिमाचल प्रदेशमध्ये झाला असून तिने बॉलिवूडला अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. यामी गौतम पहिल्यांदा फेअर अॅण्ड  लवलीच्या जाहिरातीत दिसली होती आणि त्यानंतर तिने छोट्या पडद्यावरही काम केले होते. जाहिरातीतून छोटा पडदा आणि नंतर मोठ्या पडद्यावर येणं यामी गौतमसाठी तितकं सोपं नव्हतं, पण अखेर तिने आपल्या कौशल्याच्या जोरावर आपलं स्थान मिळवलं आणि बॉलीवूडच्या चांगल्या स्टार्ससोबत चित्रपटांमध्ये दिसली.

आपल्या करिअरच्या चांगल्या दिवसांमध्ये, विकी कौशलच्या उरी द सर्जिकल स्ट्राइक या सिनेमाचे दिग्दर्शक करणाऱ्या आदित्यसोबत तिने लग्न केले आणि या जोडप्याने अतिशय साधेपणाने लग्न पार पाडले. आणि या जोडप्याने अतिशय साध्या पद्धतीने लग्न पूर्ण केले होते. लग्नादरम्यान यामी गौतमचे सुंदर लूक खूप व्हायरल झाले होते. यामी गौतम तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जास्त बोलत नाही. 

ती दिग्दर्शक आदित्य धर याला बराच काळापासून डेट करत होती. पण अखेर लग्नानंतर ही बातमी मीडियासमोर आली. यामीने 4 जून 2021 रोजी दिग्दर्शक आदित्य धरसोबत लग्न केले होते आणि दोघांच्या लग्नाला जवळपास 6 महिने झाले आहेत आणि यामीच्या आयुष्यात बरेच बदल झाले आहेत. पहिल्यांदाच यामीने पतीच्या वेगवेगळ्या गोष्टींचा खुलासा केला आहे.

यामी गौतमने स्वत: लग्नानंतर तिच्या आयुष्यात झालेल्या बदलाबद्दल सांगितले आहे. एका मुलाखतीदरम्यान यामीने सांगितले की, लग्न करण्याचा निर्णय हा तिचा आजपर्यंतचा सर्वोत्तम निर्णय होता आणि ती अजूनही विश्वास ठेवू शकत नाही की तिचे लग्न झाले आहे. कारण ती अजूनही एका शहरातून दुसऱ्या शहरात आणि सेटपासून सेटपर्यंत प्रवास करत आहे.

ती म्हणाला की एके दिवशी आदित्यने तिला विचारले की लग्नानंतर तिच्या आयुष्यात काय बदल झाला आहे कारण दोघेही एकत्र जास्त वेळ घालवू शकले नाहीत.

मुलाखतीदरम्यान यामी गौतमने आदित्य धरच्या चांगुलपणाचाही उल्लेख केला आणि तिने सांगितले की आदित्यच्या आयुष्यात खूप संघर्ष आहे आणि त्याने आपल्या प्रवासात नेहमीच प्रामाणिकपणा ठेवला आहे. यामीने असेही सांगितले की तिची आणि तिच्या पतीची आवड वेगळी आहे परंतु कौटुंबिक मूल्यांमुळे त्यांच्यात एक वेगळं कनेक्शन आणि बॉण्डिंग आहे.

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
yami gautam reavel big thing about husband aditya dhar after 6 months of marriage
News Source: 
Home Title: 

लग्नाच्या 6 महिन्यातच यामी गौतमकडून पतीबाबत मोठा खुलासा, म्हणाली, जेव्हापासून लग्न झालं...

 लग्नाच्या 6 महिन्यातच यामी गौतमकडून पतीबाबत मोठा खुलासा
Yes
No
Facebook Instant Article: 
Yes
Mobile Title: 
लग्नाच्या 6 महिन्यातच यामी गौतमकडून पतीबाबत मोठा खुलासा
Publish Later: 
No
Publish At: 
Saturday, January 15, 2022 - 13:29
Request Count: 
1
Is Breaking News: 
No