'फुकरे रिटर्न्स'चे मजेशीर व्हिडिओ

 मुंबई : 'फुकरे रिटर्न्स'चा ट्रेलर सध्या सोशल मीडियामध्ये खूपच धुमाकूळ घालत आहे. आता चित्रपटाच्या निर्मात्यांनी या विनोदी चित्रपटाचे काही मजेशीर व्हिडिओ शेअर केले आहेत.  

२०१३ साली 'फुकरे' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाल केली. त्यानंतर आता या चित्रपटाचा सिक्वेल रसिकांच्या भेटीला येण्यासाठी तयार आहे. 
चित्रपटातील सारेच कलाकार मजामस्ती करताना दिसत आहे. त्यांचेव मजेशीर व्हिडिओ फारच गंमतीशीर आहेत.  

एका व्हिडिओमध्ये वरूण शर्मा मित्रांसोबत स्पामध्ये जातो. तेथे चक्क त्याच्या पाठीवर वाघ बसतो.  

 
एक्सेल इंटरटेनमेंटची ' फुकरे ' ने २०१३ साली बॉक्सऑफिसवर तुफान कमाई केली आहे. २०१३ साली आलेला हा चित्रपट एका भन्नाट कॉन्सेप्टवर आधारित आहे. 

'फुकरे रिटर्न्स' मधील दुसर्‍या व्हिडिओमध्ये वरूण शर्मा, पुलकित सम्राट आणि मनजोत यांनी फोनमधील 'गिरी जी' ला मुलींना पटवण्याचे काही मार्ग विचारत आहे.  

 

सिनेमाच्या पहिल्या भागामध्ये  चूचा आणि भोली या दोन्ही भूमिका विशेष गाजल्या होत्या. फरहान अख्तर आणि रितेश सिंधवानी यांनी प्रोड्युस केलेल्या या चित्रपटाच्या तिसर्‍या व्हिडिओमध्ये तिघेही जेलबंद आहेत. त्यांच्यासोबत वाघही कैद असल्याने त्यांची होणारी तारांबळ पाहण्यासारखी आहे. 
  

  
फुकरे रिटर्न्स हा सिनेमा ८ डिसेंबर २०१७ रोजी रसिकांच्या भेटीला येणार आहे.   

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
viral-videos-fukrey-returns-commercials-tiger-on-naked-varun-sharma
News Source: 
Home Title: 

'फुकरे रिटर्न्स'चे मजेशीर व्हिडिओ

'फुकरे रिटर्न्स'चे मजेशीर व्हिडिओ
Yes
No
Facebook Instant Article: 
Yes
Highlights: 

२०१३ साली आला होता 'फुकरे'

पुन्हा धुमाकूळ घालण्यासाठी 'फुकरे रिटर्न्स' सज्ज 

८ डिसेंबरला येणार रसिकांंच्या भेटीला 

Authored By: 
Dipali Nevarekar