दीपिका - रणवीरनंतर आता हा अभिनेता करणार लग्न

मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या लग्नाचा सिझन सुरू आहे. एका बाजूला दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह लग्न करत आहेत. तर दुसऱ्या बाजूला प्रियंका चोप्रा आणि निक जोनस  यांच्या लग्नाची तयारी सुरू आहे. दीपवीरचं 14 आणि 15 नोव्हेंबर रोजी लग्न आहे तर प्रियंका - निकचं लग्न 2 डिसेंबरला आहे. आता यांच्यापाठोपाठ आणखी एक अभिनेता घोडीवर चढण्यासाठी सज्ज झाला आहे. 

अभिनेता वरूण धवन लवकरच लग्न करणार असल्याचं त्याने स्वतः पहिल्यांदा कबुल केलं आहे. वरूण धवन नुकताच लोकप्रिय चॅट शो कॉफी विथ करणच्या कार्यक्रमात पोहोचला होता. यावेळी त्याच्यासोबत अभिनेत्री कतरिना कैफ देखील होती. या कार्यक्रमात वरूणला त्याच्या गर्लफ्रेंडबद्दल विचारणा केली असता त्याने नताशा दलालला आपण डेट करत असल्याचे सांगितले. या दोघांमध्ये खूप चांगली बॉन्डिंग असल्याचे त्याने सांगितले. 

वरूण आणि नातशा खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. वरूण धवन पहिल्यांदाच आपल्या नात्याबद्दल मोकळेपणाने बोलला आहे. वरूण लवकरच लग्नाची तारीख निश्चित करेल. 2019 मध्ये हे दोघं लग्न करतील अशी आशा आहे. 

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
Varun Dhawan: I am dating Natasha Dalal and I plan to marry her
News Source: 
Home Title: 

दीपिका - रणवीरनंतर आता हा अभिनेता करणार लग्न

दीपिका - रणवीरनंतर आता हा अभिनेता करणार लग्न
Yes
No
Facebook Instant Article: 
Yes
Authored By: 
Dakshata Thasale
Mobile Title: 
दीपिका - रणवीरनंतर आता हा अभिनेता करणार लग्न
Publish Later: 
No
Publish At: 
Monday, November 12, 2018 - 17:55