टायगर श्रॉफची बॉक्स ऑफीसवर डरकाळी, बागी-2ची तुफान कमाई

मुंबई : टायगर श्रॉफच्या बागी-2 या चित्रपटाची बॉक्स ऑफीसवर बक्कळ कमाई सुरुच आहे. ट्रेड ऍनालिस्ट तरण आदर्श यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार बागी-2नं आत्तापर्यंत ८५ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

सोमवारी झालेल्या भारत बंद नंतरही बागी-2नं चांगली कमाई केली आहे. लवकरच हा चित्रपट १०० कोटींच्या क्लबमध्ये जाईल. शुक्रवारी २५.१० कोटी, शनिवारी २०.४० कोटी, रविवारी २७.६० कोटी आणि सोमवारी १२.१० कोटी असे एकूण ८५.२० कोटी रुपये, असं ट्विट तरण आदर्श यांनी केलं आहे.

काय आहे चित्रपटाची स्टोरी

या चित्रपटात टायगर रणवीर प्रताप सिंग उर्फ रॉनीच्या भूमिकेमध्ये आहे. रॉनी या चित्रपटात कमांडो दाखवला आहे. तर नेहा(दिशा) रॉनीची कॉलेजमधली प्रेमिका आहे. नेहाचं लग्न दुसऱ्याबरोबर झाल्यावर ती रॉनीला ४ वर्षांनी भेटते. नेहा रॉनीला तिच्या किडनॅप झालेल्या मुलीला शोधण्यासाठी मदत मागते आणि चित्रपटामध्ये सगळी अॅक्शन सुरु होते. 

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
Tiger Shroff Baaghi 2 inches closer to rs 100 crores
News Source: 
Home Title: 

टायगर श्रॉफची बॉक्स ऑफीसवर डरकाळी, बागी-2ची तुफान कमाई

टायगर श्रॉफची बॉक्स ऑफीसवर डरकाळी, बागी-2ची तुफान कमाई
Yes
No
Facebook Instant Article: 
Yes
Highlights: 

बागी-2ची जबरदस्त कमाई

टायगर श्रॉफची डरकाळी

बागी-2नं कमावले एवढे कोटी

Mobile Title: 
टायगर श्रॉफची बॉक्स ऑफीसवर डरकाळी, बागी-2ची तुफान कमाई