फोटोत दिसणाऱ्या या स्टारकिडला तुम्ही ओळखलंत का? शाहरुखच्या लेकीशी आहे खास कनेक्शन

मुंबई : फोटोत दिसणारा हा गोंडस मुलगा आता मोठा झाला असून तो खूपच हँण्डसम  दिसत आहे. तो आता चित्रपटांमध्येही पदार्पण करत आहे. त्याचा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या बॉलिवूडमधील या घरातील  अनेकजण सुपरस्टार आहेत. तो बॉलिवूडमधील दोन मोठ्या कुटुंबांचा लाडका आहे. तो नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. शाहरुख खानच्या मुलीचा हा खूप खास मित्र असून अनेकदा दोघंही एकत्र वेळ घालवताना दिसले आहेत.

कदाचित तुम्ही या मुलाला आतापर्यंत ओळखलंच असेल आणि ज्यांना याला ओळखता आलं नसेल त्यांना आम्ही सांगतो की,  हा अगस्त्य नंदांचा बालपणीचा फोटो आहे. अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा याने नुकताच त्याचा 21 वा वाढदिवस साजरा केला. त्यांच्या कुटुंबीयांनी हा खास क्षण अतिशय खास पद्धतीने साजरा केला. सोशल मीडियावर आई श्वेता नंदा, बहीण नव्या नवेली आणि मामा अभिषेक बच्चन यांनी त्याचे फोटो शेअर केले आणि तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचं सम्राट म्हटलं जातं आणि आजही त्यांचं स्टारडम कमी झालेलं नाही. त्याचे एकापाठोपाठ एक चित्रपट प्रदर्शित होत आहेत. त्याच्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. चाहते आता अगस्त्याला चित्रपटात पाहण्याची वाट पाहत आहेत आणि आता त्यांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे.

अमिताभ यांच्यानंतर त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन यानेही चित्रपटांमध्ये करिअर केलं आणि करिअरमध्ये अनेक चित्रपट केले. आता अमिताभ बच्चन कुटुंबातील पुढच्या पिढीतून म्हणजेच त्यांचा नातू अगस्त्य नंदाही बॉलिवूडमध्ये करिअर करणार आहे.

अगस्त्य नंदा हा अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन नंदा आणि निखिल नंदा यांचा मुलगा आहे. तो शाहरुख खानची मुलगी सुहाना खान आणि बोनी कपूरची मुलगी खुशी कपूरसोबत झोया अख्तरच्या 'द आर्चीज' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.  हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. अगस्त्य नंदा जहाँ 'आर्ची एंड्रयूज'च्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचबरोबर सुहाना खान वेरोनिकाच्या भूमिकेत दिसणार आहे. अगस्त्य नंदाचा जन्म 23 नोव्हेंबर 2000 रोजी झाला. अगस्त्याने २०१९ मध्येच लंडनमधील सेव्हन ओक्स स्कूलमधून शिक्षण पूर्ण केलं आहे.

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
This child seen in the photo grows up as a handsome hunk has a special connection with Shahrukh Khan daughter Suhana recognized
News Source: 
Home Title: 

फोटोत दिसणाऱ्या या स्टारकिडला तुम्ही ओळखलंत का? शाहरुखच्या लेकीशी आहे खास कनेक्शन

फोटोत दिसणाऱ्या या स्टारकिडला तुम्ही ओळखलंत का? शाहरुखच्या लेकीशी आहे खास कनेक्शन
Yes
No
Facebook Instant Article: 
Yes
Mobile Title: 
फोटोत दिसणाऱ्या या स्टारकिडला तुम्ही ओळखलंत का? शाहरुखच्या लेकीशी आहे खास कनेक्शन
Publish Later: 
No
Publish At: 
Saturday, January 28, 2023 - 18:35
Request Count: 
1
Is Breaking News: 
No