सुझान खानच्या बहिणीची कोरोना चाचणी, ट्विटरवरून दिली माहिती

मुंबई : हॉलिवूडनंतर आता बॉलिवूडला देखील कोरोनाची झळ बसत आहे. अभिनेता ऋतिक रोशनची पूर्व पत्नी सुझान खानच्या बहिणीची देखील कोरोना चाचणी करण्यात आली आहे. सुझान खानची बहिण फराह खान एक प्रसिद्ध ज्वेलरी डिझायनर आहे. फरहानेदेखील स्वत:ची कोरोना चाचणी केली आहे. आनंदाची गोष्ट म्हणजे फराहची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. संबंधित माहिती तिने ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. शिवाय सगळ्यांना सुरक्षित राहण्याचं आवाहन ही तिने सोशल मीडियाद्वारे केलं आहे.

कोरोना रिपोर्ट संबंधित बातमी  ती म्हणाली, 'कोरोना सारख्या धोकादायक विषाणूची चाचणी निगेटिव्ह आल्यामुळे मी आणि माझे कुटुंबीय अत्यंत खूश आहेत.  कोरोनाची चाचणी निगेटिव्ह असली तरी मी २९ एप्रिलपर्यंत क्वारंटाइनमध्ये असणार आहे. '

कोरोना व्हायरसचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होत आहे. फराह मंगळवारी ती तिच्या एका कर्मचाऱ्याच्या सहवासात आली होती. त्या कर्मचाऱ्यास कोरोनाची लागण झाली होती. कोरोना रुग्णाच्या सहवासात आल्यामुळे तिने स्वत:ची कोरोना चाचणी करून घेतली. 

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
sussanne khan sister farah khan tests negative for coronavirus
News Source: 
Home Title: 

सुझान खानच्या बहिणीची कोरोना चाचणी, ट्विटरवरून दिली माहिती

सुझान खानच्या बहिणीची कोरोना चाचणी, ट्विटरवरून दिली माहिती
Yes
No
Facebook Instant Article: 
Yes
Mobile Title: 
सुझान खानच्या बहिणीची कोरोना चाचणी, ट्विटरवरून दिली माहिती
Publish Later: 
No
Publish At: 
Friday, April 17, 2020 - 14:54