''म्होरक्या'' या सिनेमाला मिळाला स्पेशल मेन्शन अवॉर्ड

मुंबई :  65 व्या राष्ट्रीय पुरस्काराची घोषणा झाली आहे. या पुरस्कारात अनेक मराठी सिनेमांनी बाजी मारली आहे. या पुरस्कारात स्पेशल मेन्शन अवॉर्ड म्हणजे विशेष कामगिरी पुरस्कार देण्यात आला. यामध्ये 'म्होरक्या' या मराठी सिनेमाला हा पुरस्कार देण्यात आला आहे. स्वस्तिक प्रिती फिल्म प्रोडक्शन आणि अमर चित्रवाणी निर्मित “म्होरक्या” हा दिग्दर्शक अमर देवकर यांचा हा पहिलाच सिनेमा आहे.सिनेमाच्या पहिल्या पोस्टरमध्ये नायकाची म्हणजेच म्होरक्याचे सावलीरुपातील प्रतिबिंब पहायला मिळालं.ज्यात भारताच्या नकाशाची आकृती असल्याचा आभास निर्माण होत आहे.तर दुस-या पोस्टरमध्ये कथेतील सहनायक उलटा पहायला मिळालं आबे.

अतिशय चिकित्सक पद्धतीची ही दोन पोस्टर लॉन्च झाली आहेत. लोकशाहीमध्ये नेतृत्व कसं असावं? हा विषय मार्मिकपणे मांडलेला आहे.या प्रश्नाची आणि उत्तराची चिकित्सा करणारा कथाप्रवास म्हणजे चित्रपट म्होरक्या.या सिनेमाची राष्ट्रीय पुरस्काराने घेतलेली नोंद ही अतिशय कौतुकास्पद आहे. 

ही आहे सिनेमाची कथा 

एका सामान्य कुटुंबातील मुलाची इच्छाशक्ती, त्याची संघर्षपूर्ण वाटचाल, समाजातील माणुसकी व माणसांसाठी दिलेला लढा म्हणजे म्होरक्या द लिडर. सोलापूरत्या मातीतील कथानक असलेल्या या चित्रपटातून नेतृत्व कसे करावे असा संदेश देण्यात आला आहे. हा सिनेमाची निर्मिती कल्याण पडाल, लेखक व दिग्दर्शक अमेर देवकर आहे.  

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
Special Mention Awards for Mhorkya Marathi Movie
News Source: 
Home Title: 

''म्होरक्या'' या सिनेमाला मिळाला स्पेशल मेन्शन अवॉर्ड

''म्होरक्या'' या सिनेमाला मिळाला स्पेशल मेन्शन अवॉर्ड
Yes
No
Facebook Instant Article: 
Yes
Highlights: 

म्होरक्या सिनेमावर राष्ट्रीय पुरस्काराची मोहर 

65 व्या राष्ट्रीय पुरस्काराची यादी जाहीर 

मराठी सिनेमांनी मारली बाजू

Authored By: 
Dakshata Thasale
Mobile Title: 
''म्होरक्या'' या सिनेमाला मिळाला स्पेशल मेन्शन अवॉर्ड