Sidharth-Kiara Advani Wedding : लग्नानंतर कियारानं ओलांडलं माप; सिद्धार्थच्या कुटुंबियांकडून सासरी असं झालं स्वागत

Sidharth Malhotra Kiara Advani Photos From His House : बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) आणि कियारा अडवाणी (Kiara Advani ) यांचा जैसलमेरच्या सूर्यगढ पॅलेसमध्ये लग्नसोहळा पार पडला. सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. दरम्यान, लग्नानंतर आता त्या दोघांचे सिद्धार्थच्या घरा समोरचे काही व्हिडीओ समोर आले आहेत. दरम्यान, त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

सिद्धार्थ आणि कियाराचे हे व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं शेअर केले आहेत. सिद्धार्थ आणि कियारा या दोघांचे हे व्हायरल झालेले व्हिडीओ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. व्हायरल झालेल्या एका व्हिडीओत सिद्धार्थ आणि कियारा हे दोघेही पापाराझींना मिठाई वाटताना दिसत आहेत. यावेळी कियारानं लाल रंगाचा अनारकली ड्रेस परिधान केला आहे, तर सिद्धार्थनं लाल रंगाची शेरवाणी परिधान केली आहे. या व्हिडीओत सिद्धार्थ आणि कियारा दोघेही सुंदर दिसत आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

याशिवाय आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत सिद्धार्थच्या घराला असलेली लायटींग दिसत आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सिद्धार्थचं हे घर दिल्लीला आहे. तर आणखी एका व्हिडीओत सिद्धार्थच्या हातावर असलेली कियाराच्या नावाची मेहंदी दिसत आहे. 

हेही वाचा : Sidharth Kiara Wedding : लग्नाच्या लूकपेक्षा कियाराचे 'कलिरे' चर्चेत; सिडसाठी तिनं केलं लय भारी काम!

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

कियारा आणि सिद्धार्थ हे राजस्थान जैसलमेर येथील सूर्यगड पॅलेसमध्ये सप्तपदी घेतल्या आहेत. सिद्धार्थ आणि कियारा या दोघांनी 2021 साली प्रदर्शित झालेल्या 'शेरशाह' (Shershaah) या चित्रपटात एकत्र काम केलं होते. या चित्रपटाच्या सेटवर त्यांची चांगली मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाल्याचे म्हटले जात आहे. त्यानंतर कियारा आणि सिद्धार्थ हे सगळीकडे एकत्र दिसले. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या दोघांच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचे झाले तर सिद्धार्थ लवकरच, दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या 'इंडियन पोलिस फोर्स' (Indian Police Force) या सीरिजमध्ये दिसणार आहे. ही सीरिज Amazon Prime वर प्रदर्शित होणार आहे. तर दुसरीकडे, कियाराच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ती लवकरच 'सत्यप्रेम की कथा' (Satyaprem Ki Katha) या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
Sidharth Malhotra Kiara Advani Wedding Photos From His House in delhi
News Source: 
Home Title: 

Sidharth-Kiara Advani Wedding : लग्नानंतर कियारानं ओलांडलं माप; सिद्धार्थच्या कुटुंबियांकडून सासरी असं झालं स्वागत

Sidharth-Kiara Advani Wedding : लग्नानंतर कियारानं ओलांडलं माप; सिद्धार्थच्या कुटुंबियांकडून सासरी असं झालं स्वागत
Yes
No
Facebook Instant Article: 
Yes
Mobile Title: 
Sidharth-Kiara Advani Wedding : लग्नानंतर कियारानं ओलांडलं माप; सिद्धार्थच्या कुटुंब
Publish Later: 
No
Publish At: 
Thursday, February 9, 2023 - 10:27
Created By: 
Diksha Patil
Updated By: 
Diksha Patil
Published By: 
Diksha Patil
Request Count: 
1
Is Breaking News: 
No