हिरो नाही 'झिरो' झाला शाहरुख खान
मुंबई : बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खानसाठी २०१७ हे वर्ष फारसं चांगलं गेलं नाही. पण २०१८ची सुरुवात शाहरुखनं दिमाखात केली आहे. शाहरुखनं त्याच्या नव्या चित्रपटाचं नाव आणि टिझर लॉन्च केला आहे.
झिरो असं या चित्रपटाचं नाव आहे. २१ डिसेंबरला हा चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटात शाहरुखबरोबर अनुष्का शर्मा आणि कतरिना कैफ मुख्य भूमिकेत असतील. फक्त १६ तासांमध्ये शाहरुखच्या झिरो चित्रपटाला यूट्यूबवर २.७ मिलियन व्ह्यूज, फेसबूकवर ३.१ मिलियन आणि इन्स्टाग्रामवर २ मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले.
मागच्या वर्षी शाहरुखचा हॅरी मेट सेजल हा चित्रपट रिलीज झाला होता पण या चित्रपटाला फारशी उल्लेखनीय कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे या चित्रपटाकडून शाहरुख आणि त्याच्या फॅन्सच्या अपेक्षा वाढल्या असतील.
English Title (For URL purpose only - Max 200 characters):
shahrukh-khan-movie-zero-teaser-is-hit-on-youtube-facebook-instagram
News Source:
Home Title:
हिरो नाही 'झिरो' झाला शाहरुख खान

Yes
No
Facebook Instant Article:
Yes