तैमुरला पहिल्या बालदिनाला मिळालं करोडोंचं गिफ्ट

मुंबई : गेल्या वर्षी सैफ अली खान आणि करिनाच्या आयुष्यात तैमुर आला आणि त्यांचं सारं जीवनच  बदललं.

अनेक सेलिब्रिटींपेक्षा तैमुर अली खान हा मिडियामध्ये अधिक प्रसिद्ध आहे. तैमुरचे गोंडस फोटो नेटाकर्‍यांचा आवडीचा विषय आहे. त्यामुळे त्याचा नवा फोटो अअला की लगेच व्हायरल होतो. 

आज भारतामध्ये बालदिन साजरा केला जात आहे. तैमुरचा आज पहिलाच बालदिन आहे. मग यादिवशी तैमुरला काय गिफ्ट मिळाले ? तुम्हांला ठाऊक आहे का ?  

नुकतीच सैफ अली खानने एसआरटी गाडी घेतली आहे. यानंतर मीडियाशी बोलताना तो म्हणाला या गाडीत मागे एक बेबी सीट लावून तैमुरला फिरायला घेऊन जाणार आहे.  
बालदिनाला तैमुरला कोणतं  गिफ्ट देणार असा प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा ही गाडीच त्याला गिफ्ट असेल अशी प्रतिक्रिया त्याने दिली. 

तैमुरला या गाडीचा रंग आवडेल अशी प्रतिक्रिया त्याने दिली आहे. सैफने विकत घेतलेल्या गाडीची किंमत सुमारे १.३० करोड आहे. 
येत्या २० डिसेंबरला तैमुरचा  पहिला वाढदिवस आहे. पण यावेळेस फार मोठ्या प्रमाणात सेलिब्रेशन होणार नाही अशी माहिती करिष्माने दिली होती. 

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
Saif ali khan gifts his new car to taimur
News Source: 
Home Title: 

तैमुरला पहिल्या बालदिनाला मिळालं करोडोंचं गिफ्ट

तैमुरला पहिल्या बालदिनाला मिळालं करोडोंचं गिफ्ट
Yes
No
Facebook Instant Article: 
Yes
Highlights: 

सैफ अली खानने विकत घेतली एसआरटी गाडी

एसआरटी गाडीची किंमत  १.३० करोड  

ही गाडी तैमुरला गिफ्ट