Bigg Boss 15: शोमध्ये राकेश-शमिता एकत्र; अभिनेत्याच्या पहिल्या पत्नीची प्रतिक्रिया
मुंबई : 'बीग बॉस ओटीटी' शोच्या माध्यमातून एकमेकांच्या जवळ आलेले अभिनेत्री शमिता शेट्टी आणि अभिनेता राकेश बापट कायम चर्चेत असतात. दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याचं समोर येत आहे. एवढंच नाही तर दोघांनी 'बिग बॉस'च्या घरात त्यांच्या नात्याची कबुली देखील दिली. आता दोघे 'बिग बॉस 15'मध्ये देखील एकत्र दिसणार आहेत. राकेश बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड कंटेस्टेंट म्हणून येणार आहे. त्यांच्यासोबत गायक नेहा भसीन देखील बिग बॉसच्या घरात एन्ट्री करणार आहे. दरम्यान, राकेश आणि शमिता पुन्हा एकत्र होत असताना राकेशच्या पहिल्या पत्नीने सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे.
राकेश बापटच्या पहिल्या पत्नीचं नाव रिद्धी डोगरा आहे. सोशल मीडियावर सध्या राकेश आणि शमिताचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर रिद्धीने प्रतिक्रिया दिली आहे. रिद्धी म्हणाली, 'चांहल्या प्रकारे खेळा आणि निट राहा...' सध्या रिद्धीचं हे ट्विट तुफान व्हायरल होत आहेत.
Play well. Be well https://t.co/VRijbWPUX7
— Ridhi Dogra (@iRidhiDogra) November 5, 2021
रिद्धी आणि राकेश वेगळं होण्याचं कारण...
राकेश आणि रिद्धीने एका संदेशाद्वारे चाहत्यांना त्यांच्या विभक्ततेची माहिती दिली होती, दोघांनीही सांगितले होते की , आम्ही वेगळे होत आहोत. आम्ही हा निर्णय परस्पर आदराने आणि एकमेकांसाठी , आमच्या कुटुंबीयांची काळजी घेऊन घेतला आहे. जरी आपण नेहमीच चांगले मित्र असू. पण आता आम्ही जोडपे म्हणून राहणार नाही.
Bigg Boss 15: शोमध्ये राकेश-शमिता एकत्र; अभिनेत्याच्या पहिल्या पत्नीची प्रतिक्रिया
