अभिनेत्री राधिका आपटेचे फेसबुक अकाऊंट हॅक

नवी दिल्ली : फेसबुक आणि इन्स्टाग्रामची सेवा काही काळासाठी ठप्प झाली. त्यामुळे जगभरातील अनेक यूजर्स हैराण झाले. परंतु, ते काही काळासाठीच. पण, अभिनेत्री राधिका आपटे शनिवारपासून अनिश्चित काळासाठी हैराण झाली. फेसबुक हे तिच्या हैराणीचे प्रमुख कारण होते.

राधिका आपेटेने स्वत:च ही माहिती ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. राधिकाने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, कृपया कोणीही मला मेसेंजरवर मेसेज पाठवू नका. माझे फेसबुक अकाऊंट पुन्हा एकदा हॅक झाले आहे. आपले अकाऊंट शनिवारी हॅक झाल्याचेही राधिकाने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. 
मीडिया रिपोर्टनुसार शनिवारी सुमारे एक तासासाठी फेसबुक आणि इस्टाग्राम ठप्प झाले होते. त्यामुळे लोकांना लॉगइन आणि लॉगआऊट करताना अडचण येत होती. त्यानंतर ही सेवा सुरळीत सुरू झाली. मात्र, राधिकाची समस्या कायम राहिली. शनिवारी नेमके किती वाजता आपले अकाऊंट हॅक झाले, हे राधिकाने स्पष्ट केले नाही.

दरम्यान, राधिका सध्या सैफ अली खान सोबत 'बाजार'च्या शूटींगमध्ये व्यग्र आहे. या सोबतच सैफ अली खान आणि नवाजुद्दीने सिद्दीकीसोबत लवकरच ती एका टीव्ही सिरीअलमध्येही दिसणार आहे.

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
Radhika Aptes facebook account has been hacked
News Source: 
Home Title: 

अभिनेत्री राधिका आपटेचे फेसबुक अकाऊंट हॅक

अभिनेत्री राधिका आपटेचे फेसबुक अकाऊंट हॅक
Yes
No
Facebook Instant Article: 
Yes
Authored By: 
Annaso Chavare