रोका सोहळ्यानंतर प्रियंका-निकने शेअर केला रोमांटिक फोटो...

मुंबई : बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा आणि अमेरिकन सिंगर निक जोनस यांच्या नात्यावर आता शिक्कामोर्तब झालाय. दिर्घ काळापासून रिलेशनशीप आणि त्यामुळे चर्चेत असणाऱ्या या कपलने नात्याला नवे नाव दिले आहे. आजच मुंबईतील प्रियंकाच्या घरी दोघांचाही रोका सोहळा पार पडला. याप्रसंगी प्रियंकाच्या कुटुंबियांसह निकचे आईवडीलही सहभागी झाले होते. रोका सोहळ्यानंतर मुंबईतील एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये प्रियंका-निकची एन्गेजमेंट पार्टी रंगणार आहे. त्यापूर्वी प्रियंका आणि निकने एक रोमांटिक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. निकने प्रियंकासोबतचा फोटो शेअर करुन भावी मिसेस जोनस असे लिहिले आहे. 

 

Future Mrs. Jonas. My heart. My love.

A post shared by Nick Jonas (@nickjonas) on

प्रियंकाने देखील हाच फोटो शेअर करत ''With all my heart and soul..'' अशी पोस्ट केली आहे.

 

Taken.. With all my heart and soul..

A post shared by Priyanka Chopra (@priyankachopra) on

दीर्घ काळापासून प्रियंका आणि निकच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. पण दोघांनीही याबद्दल मौन बाळगले होते. पण आज अखेर या दोघांनीही त्यांचे नाते जगजाहीर केले आहे. 

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
priyanka chopra and nick jonas shared romantic photo after roka ceremoney
News Source: 
Home Title: 

रोका सोहळ्यानंतर प्रियंका-निकने शेअर केला रोमांटिक फोटो...

रोका सोहळ्यानंतर प्रियंका-निकने शेअर केला रोमांटिक फोटो...
Yes
No
Facebook Instant Article: 
Yes
Mobile Title: 
रोका सोहळ्यानंतर प्रियंका-निकने शेअर केला रोमांटिक फोटो...
Publish Later: 
No
Publish At: 
Saturday, August 18, 2018 - 17:08