प्रेग्नंट भारती सिंग सेटवर पडता-पडता वाचली, नवऱ्याने दिली ताकीद

मुंबई : प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंग तिच्या कॉमेडी स्टाईलमुळे लोकांच्या मनावर राज्य करते. भारती सिंग गरोदर असून तिचा पाचवा महिना सुरू आहे. अशा परिस्थितीतही ती सतत काम करत आहे. भारतीला,  प्रसूतीपर्यंत काम करायचं आहे. जेणेकरून तिचे मूलही कष्टकरी जन्माला येईल. असं ती अनेकदा म्हणताना दिसते.

तिचा पती हर्ष लिंबाचिया हा नेहमी भारतीसोबत असतो आणि तिची काळजी घेतो. मात्र नुकतंच तिच्यासोबत असं काही घडलं, ज्यानंतर भारतीला हर्षने ओरडा ऐकून घ्यावा लागला. खरं तर, हे कपल हुनरबाज हा रिअॅलिटी शो होस्ट करत आहे. शूटिंगदरम्यान भारती नेहमीप्रमाणे सेटवर मस्ती करत होती. यावेळी ती पडता-पडता वाचली

यामुळे हर्ष चांगलाच संतापला. त्याने भारतीला सांगितलं की, आतापासून जर तू मला मस्ती करताना दिसलीस तर तुला माझा मार पडेल. हे सर्व चालणार नाही. शांतपणे बस.'' हर्षचं एवढं प्रेम पाहून भारती तिच्या नवऱ्याच्या पुन्हा प्रेमात पडली आणि ती हर्षच्या गालाला किस करते. भारतीने काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, जेव्हा मी हर्षला माझ्या प्रेग्नेंसीबद्दल सांगितलं तेव्हा त्याच्या डोळ्यात आनंदाअश्रू आले होते. त्याला माझ्या एवढचं आमच्या होणाऱ्या बाळावरही  खूप प्रेम आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

भारती आणि हर्ष 2017 मध्ये लग्न बंधनात अडकले होते. दोघांनी काही दिवसांपूर्वीच लग्नाचा चौथा वाढदिवस साजरा केला. दोघांनीही मोठ्या थाटामाटात लग्न केले होतं. लग्नाला अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती.

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
Pregnant Bharti Singh survived falling on the set, husband Harsh Limbachiyaa's mercury was high, said this thing - watch video
News Source: 
Home Title: 

प्रेग्नंट भारती सिंग सेटवर पडता-पडता वाचली, नवऱ्याने दिली ताकीद

प्रेग्नंट भारती सिंग सेटवर पडता-पडता वाचली, नवऱ्याने दिली ताकीद
Yes
No
Facebook Instant Article: 
Yes
Mobile Title: 
प्रेग्नंट भारती सिंग सेटवर पडता-पडता वाचली, नवऱ्याने दिली ताकीद
Publish Later: 
No
Publish At: 
Thursday, February 3, 2022 - 21:03
Request Count: 
1
Is Breaking News: 
No