नाना-तनुश्री वादामुळे सिनेसृष्टीत दोन गट, पहलाज निहलानी नानाच्या समर्थनात

मुंबई : अभिनेत्री तनुश्री दत्ताने अभिनेता नाना पाटेकर यांच्यावर केलेल्या आरोपांनंतर चित्रपटसृष्टी दोन गटात विभागली गेल्याचं पाहायला मिळतंय. सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांनी या प्रकरणी अभिनेता नाना पाटेकर यांचं समर्थन केलंय. नाना एक सज्जन व्यक्ती असून त्यांच्यावर आरोप करणारी तनुश्री १० वर्षे गप्प का होती असा सवाल निहलानी यांनी उपस्थित केलाय.

काय म्हणाली तनुश्री ? 

‘हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटाच्या सेटवर जवळपास दहा वर्षांपूर्वी नानांनी आपल्याशी असभ्य वर्त केल्याचा आरोप तनुश्रीने केला होता. त्याशिवाय त्यावेळी आपल्या पाठिशी कोणीच उभं राहिलं नसल्याचं म्हणत तिने चित्रपटाच्या निर्माते- दिग्दर्शकांवरही निशाणा साधला होता. नाना पाटेकर यांनी माझ्याशी असभ्य वर्तन केलं हे अनेकांनी पाहिलं पण कोणीही माझ्यामागे उभं राहिलं नाही, सगळ्यांनीच केवळ बघ्याची भूमिका निभावली असं ती म्हणाली होती. नाना पाटेकर सेटवर अभिनेत्रींशी असभ्य वर्तन करतात, अनेकींना त्यांनी मारहाण केली आहे. कलाविश्वात अनेकांनाच त्यांच्या या स्वभावाची कल्पना आहे, मात्र त्यांच्याविरुद्ध बोलण्याची हिंमत कोणीच करत नाही असा आरोप तिने केला होता.

नानांनी आरोप नाकारले 

नाना पाटेकर यांनी तनुश्री दत्ताने लावलेले सर्व आरोप नाकारले आहेत. नाना पाटेकरांनी सर्व आरोप फेटाळून जर तिला असं वाटत असेल तर तिने कायद्याने कारवाई करावी. 10 वर्षांनी लावलेल्या आरोपावर नाना म्हणाले की, एक व्यक्तीने अशा पद्धतीने वक्तव्य केल्यावर मी काय बोलणार? लैंगिक अत्याचार म्हणजे काय? एकाचवेळी आमच्यासोबत सेटवर 200 हून अधिक लोकं असायची. त्यामुळे मी देखील कायद्याने काय करता येईल हे बघेन कारण कोणत्याही पद्धतीचा संवाद मला याबाबत करायचा नाही. 

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
Nana Patkar And Tanushri Datta controversy, Pahlaj Nihlani support to Nana Patekar
News Source: 
Home Title: 

नाना-तनुश्री वादामुळे सिनेसृष्टीत दोन गट, पहलाज निहलानी नानाच्या समर्थनात

नाना-तनुश्री वादामुळे सिनेसृष्टीत दोन गट, पहलाज निहलानी नानाच्या समर्थनात
Yes
No
Facebook Instant Article: 
Yes
Mobile Title: 
नाना-तनुश्री वादामुळे सिनेसृष्टीत दोन गट, पहलाज निहलानी नानाच्या समर्थनात
Publish Later: 
No
Publish At: 
Sunday, September 30, 2018 - 09:55