बॉयफ्रेंडसोबत बेडरुममध्ये असतानाच प्रियांकाला त्यांनी पकडलं, त्यानंतर जे घडलं ते ...

मुंबई : अभिनेत्री प्रियंका चोप्रा आज फक्त एक अभिनेत्री नाही अनेक महिलांची प्रेरणा. एक महिला आपल्या आयुष्यात काय करू शकते, हे सांगायचं झालं तर प्रियंका देखील एक नाव आहे. प्रियंकाने फार कमी वेळात चांगली कामगिरी केली आहे. आता प्रसिद्ध आणि यशस्वी महिला म्हणून नावाजलेल्या प्रियंकाचं लहानपण इतर मुलींसारखं नव्हतं. 

तिने आपले शालेय शिक्षण अमेरिकेतून केलं. यादरम्यान तिने असं काही केले की तुम्हालाही आश्चर्य वाटेल. प्रियंकाने गेल्या वर्षी तिचं एक पुस्तक लाँच केलं, ज्याचं नाव 'अनफिनिश्ड'  आहे. या पुस्तकात प्रियंकाने बरेच धक्कादायक खुलासे केले.

पुस्तकात प्रियंकाने दहावीच्या वर्गातील एक किस्साही लिहिला. प्रियंका अमेरिकेत शालेय शिक्षण घेत होती. त्यादरम्यान ती बॉब नावाच्या मुलाच्या प्रेमात पडली. घरात कोणी नसताना प्रियंका बॉबला घरी बोलवायची.

एके दिवशी बॉब आणि प्रियांका घरी टीव्ही पाहत होते. तेवढ्यात प्रियंकाची मावशी घरी आली. मावशीच्या घरी येण्याची ही वेळ नव्हती. त्यामुळे दोघेही घाबरले, आता बॉबला बाहेर जाण्यासाठी दुसरा मार्ग नव्हता. 

अशा स्थितीत दोघेही खोलीच्या दिशेने धावले. प्रियंकाने बॉयफ्रेंडला लपण्यास सांगितलं. पुढे प्रियंकाने लिहिलं की, 'मावशी माझी खोली पाहू लागली. मी बेडवर पुस्तक घेवून बसली होती. '

'मावशीने मला माझं कपाट खोलण्यास सांगितंल, तेव्हा मी घाबरली, कारण त्यामध्ये बॉब होता. मावशीला लक्षात आलं होतं की कपाटत मुलगा आहे. त्यानंतर तिने माझ्या आईला फोन केला...'

तेव्हा संकटात सापडलेल्या प्रियंकाने फक्त बॉलिवूडमध्ये नाही तर हॉलिवूडमध्ये देखील वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. सध्या ती तिच्या बाळामुळे चर्चेत आहे.

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
mausi grabbed Priyanka while she was in the bedroom with her boyfriend
News Source: 
Home Title: 

बॉयफ्रेंडसोबत बेडरुममध्ये असतानाच प्रियांकाला त्यांनी पकडलं,  त्यानंतर जे घडलं ते  ... 
 

बॉयफ्रेंडसोबत बेडरुममध्ये असतानाच प्रियांकाला त्यांनी पकडलं,  त्यानंतर जे घडलं ते  ...
Yes
No
Facebook Instant Article: 
Yes
Mobile Title: 
बॉयफ्रेंडसोबत बेडरुममध्ये असतानाच प्रियांकाला त्यांनी पकडलं, त्यानंतर जे घडलं...
Publish Later: 
No
Publish At: 
Monday, January 24, 2022 - 12:07
Request Count: 
1
Is Breaking News: 
No